पंकज चहांदे
देसाईगंज / वडसा तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
देसाईगंज :- सद्यास्थितीत बदलत्या वातावरणामुळे अनेकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.अनेकांची परिस्थिती हातावर आणून पानावर खाण्याचीच असल्याने आरोग्यावर आवश्यक त्या प्रमाणात खर्च करून उपचार करू शकत नाहीत.
ही गंभीर बाब लक्षात घेता काँग्रेस नेत्या डाॅ.शिलु चिमुरकर यांच्या नेतृत्वात देसाईगंज तालुक्यातील कुरुड येथील झुरे मोहल्ल्याच्या मारोती देवस्थानासमोरील भव्य पटांगणात सकाळी ११ वाजेपासुन ते ३ वाजेपर्यंत भव्य मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबीरात त्या-त्या आरोग्य तज्ञ डाॅक्टरांकडुन आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार केल्या जाणार आहे.यात प्रामुख्याने हृदयरोग, हाडांचे डाॅक्टर, स्त्रीरोगतज्ज्ञ, मूत्ररोग तज्ञ, सामान्य रोगाची तपासणी, ईसीजी मोफत तपासणी करण्यात येणार असून गरजेनुसार औषधी वाटप करण्यात येणार आहे.
तरी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा परिसरातील रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन डाॅ.शिलु चिमुरकर व मित्र परिवारांकडुन करण्यात आले आहे.