रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी
चिमूर :-
चिमूर तालुक्यातील मौजा तळोधी नाईक,येथून जवळच असलेल्या किटाळी (तुकूम) येथे आज पहाटेच्या सुमारास झोपेत असलेल्या अकरा वर्षीय मुलीला सर्प दंशाने मृत्यू झाल्याची दु:खद् घटना घडली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे रुचिका विठ्ठल आत्राम असे मृतक मुलीचे नाव असून ती वरोरा तालुक्यातील खांबाळा येथील रहिवाशी आहे.
रुचिकाची आई किटाळी इथे आपल्या भावाला राखी बांधण्याकरीता कालच आली हॊती.मात्र आज दिनांक २६ ऑगस्ट ला पहाटेच्या सुमारास गाढ झोपेत असताना सापाने दंश केला.
उपचारासाठी तिला उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे हलविण्यात आले.मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.या घटनेमुळे परीसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.