कंत्राट शिक्षक भरतीतील डी.एड बी .एड.उमेदवारांचे टी. इ. टी. परीक्षा पास अट रद्द करा… — शिवसेना (ऊ. बा. ठा.) ची महाराष्ट्र शासनाला मागणी…

    राकेश चव्हाण

कुरखेडा तालुका प्रतिनिधी

 गडचिरोली जिल्हातील अनेक जी. प. शाळेत शिक्षक चे पद रिक्त आहे. जिल्हातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचे रिक्त पद असलेल्या ठिकाणी कंत्राट पद्धतीने भरण्या संदर्भात जाहिरात निघाली परंतु त्या जाहिरातीत शिक्षक पद भरती साठी टी. इ .टी.परीक्षा पास असलेल्यांना च फॉर्म भरता येईल अशी अट ठेवल्याने अनेक डी. एड.आणि बी. एड पास उमेदवार या भरती पासून वंचित राहतील.अनेक उमेदवार चार पाच वर्षा पूर्वी पासून डी. एड.,बी एड.पदवी परीक्षा पास होऊन आहेत टी .इ .टी. परीक्षा पास ची अट टाकल्याने अन्याय झाला आहे.

             या उमेदवारांनी काल जिल्हा परिषद मध्ये भरण्या साठी आले असता त्यांना फॉर्म भरता आले नाही. काही कामा निमित्त शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल जिल्हा परिषद मध्ये आले असता अन्याय ग्रस्त उमेदवारांनी भेट घेऊन आपली कैफियत सांगितली.

          त्या नंतर सर्व उमेदवारांना घेऊन जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी यांची भेट घेऊन टी इ. टी ची अट रद्द करण्या विषयी विनंती केली.परंतु शिक्षण अधिकारी पवार यांनी सांगितले की शासन स्तरा वरूनच ही अट टाकली आहे आम्ही काही करू शकत नाही.

           जिल्ह्यात अनेक शाळेत पद रिक्त आहेत शिक्षका अभावी अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास क्रमाची अडचण निर्माण होत आहे .डी एड., बी.एड.हाच कोर्स फक्त शिक्षक पदा साठी असताना टी .इ. टी .ची अट टाकायची आवश्यकता काय? उमेदवारांनी आमची समस्या महाराष्ट्र शासनाला कळवून टी. इ टी.रद्द करण्या विषयी न्याय मिळवून देण्या करिता शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल याना निवेदन दिले.

           याप्रसंगी माजी जिल्हा समन्वयक भरत जोशी होते.टी. इ टी.ही अट रद्द करणे करिता किवा शिथिल करण्या करिता शासनाला निवेदन देऊन तुमची यथोचित मागणी शासन दरबारी रेटून धरुअसे डी एड.उमेदवारांना शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल यांनी आश्वासन दिले.