तालुका प्रतिनिधी चिमूर
चिमूर तालुक्यातील पळसगांव येथे उपकेंद्र असून आरोग्य सेविका नाही.
वेळेवर उपचार न झाल्यास सुगर,बिपीच्या नागरिकांना खूप त्रास होत असतोय,याचबरोबर इतर रुग्णांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
आरोग्य सेविका रुजू करुन घेण्यासंबंधाने चंद्रपूर जिल्हा आरोग्य विभागाचे होणारे दुर्लक्ष पळसगाव परिसरातील नागरिकांवर अन्याय करणारे आहे.
मात्र,सेविकाविना येथील उपकेंद्रे वाऱ्यावर असल्याचे पळसगांव येथील नागरिक बोलत आहेत.त्यामुळे पळसगाव उपकेंद्रामध्ये स्थायिक आरोग्य सेविका द्यावे अशी मागणी पळसगाव येथील नागरिकांसह युवक काँग्रेस कार्यकर्ता शुभम गजभिये यांनी केली आहे.