रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी
डॉ.तानाजी भाऊ जाधव,टायगर राष्ट्रीय अध्यक्ष तथा टायगर ग्रुप संस्थापक अध्यक्ष जालिंदर भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रम्हा विष्णू महेश त्रिमूर्ती मंदिर खरवड येथील टायगर ग्रुप खरवडची शाखा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे लाभलेले रिषभजी रठ्ठे टायगर ग्रुप वरोरा तालुका अध्यक्ष(भावी चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष)यांचा हातानी उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
यावेळी खरवड गावातील युवकांना भाषणाच्या माध्यमातून रिषभ रठ्ठे यांनी सामाजिक क्षेत्रातील प्रेरणा दिली आणि संपूर्ण टायगर ग्रुप महाराष्ट्राची सामाजिक कामांची भूमिका युवकांना सांगण्यात आली आणि खरवड गावातील असंख्य मुलांनी टायगर ग्रुप मध्ये प्रवेश घेतला.
यावेळी संपूर्ण टायगर ग्रुप सदस्य,मोहित तडस,पवन गिरटकर,समीर गेडाम,गौरव कोटकर,केतन मेश्राम,विनोद आत्राम,रोहित गेडाम,हार्दिक सावरकर,निखिल अंद्रस्कार,सुरज दुरखंडे,अनिकेत बदाई,मुकेश पाटील,मंथन कोटकर,समीर नरड,मनोज महाडोळे,अमोल दडमल,ओम कार्लेकर,विकी गवई,प्रतीक गौरकार,बादल ठावरी,कृष्णा ठाकरे,रोशन कुळसंगे,प्रसाद गमे,प्रवीण खिरटकर,धनंजय गागी,वैभव टिपले व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.