दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
महाराष्ट्र राज्यात शाळकरी आणि अल्पवयीन मुलीवर मोठ्या प्रमाणात अत्याचार वाढले आहेत.अन्याय अत्याचारामुळे राज्यांतील लाडक्या बहिणीच्या लेकी असुरक्षित झाल्या आहेत.राज्यातील लेकीच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी आणि लेकी सुरक्षित राहण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलावीत,अशी मागणी युवक काँग्रेस कार्यकर्ते शुभम गजभिये यांनी केली आहे.
एका रात्रीत लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला जातो,एका रात्रीतून नवीन सरकार तयार केले जाते.मग राज्यांतील व देशातील लेकींवर अन्याय,अत्याचार करणाऱ्या नराधमाना मोकळे का सोडले जात आहे?
राज्यांतील महिलांवर दररोज मोठ्या प्रमाणात अत्याचार वाढले आहेत.हे अत्याचार त्वरित थांबले पाहिजेत,सरकारने यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात आणि राज्यांतील महिलांवर तसेच मुलींवर होत असलेले अत्याचार थांबविण्यासाठी गुन्हेगारांना एका रात्रीत फासावर लटकवले पाहिजेत अशीही मागणी युवक काँग्रेस कार्यकर्ते शुभम गजभिये यांनी केले आहे.
वारंवार असुरक्षित व्यवस्था कोण निर्माण करतो आहे आणि असुरक्षित व्यवस्थेला कोण पाठबळ देतो आहे,याला अनुसरून सारासार विचार शासन स्तरावर संवेदनशीलपणे का म्हणून होत नाही?हा मुद्दा सुध्दा तितकाच गंभीर आहे.