उद्या जुन्या पेन्शन बाबत अमरावतीला महत्वाची सभा..

   युवराज डोंगरे

उपसंपादक/खल्लार

      सर्व पदाधिकारी शासकीय,निम शासकीय,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी संघटना तथा सर्व सामजिक संघटना यांची,उद्या दि 25 ऑगस्टला विशेष सभा आयोजित केली आहे.

      दुपारी 4 वाजता,नविन अमरावती तहसिल कार्यालया मधिल सभागृह,संत ज्ञानेश्वर सास्कृतिक सभागृह च्या समोर, पंचवटी ते इर्विन रोड,अमरावती येथे सभा आयोजित केलेली आहे. 

       त्यामध्ये 1) 15 सप्टेंबर शिर्डी येथे होऊ घातलेल्या पेन्शन राज्य अधिवेशन बाबत चर्चा करणे व त्याबाबत आपल्या अमरावती जिल्ह्याचे नियोजन करण्याबाबत,आपले तन मन धनाने सहकार्य बाबत सर्व श्रेष्ठ व ज्येष्ठ मंडळी च्या सहकार्य शिवाय सदर बाब करणे शक्य नाही.

      म्हणून आपण आम्हाला याबाबत सहकार्य व मार्गदर्शन करण्यासाठी सदर सभेला यावे.या सभेमध्ये महत्वाचे 1982 /1984 ची जुनीच पेशन लागू करण्याबाबत सर्व संघटना चे अमरावती जिल्ह्यातील राज्य,विभाग,जिल्हा,तालुका पदाधिकारी या सर्वांनी सदर सभेला उपस्थित राहावे,असे सर्व संघटना समन्वय समिती जिल्हा अमरावती तथा गौरव काळे /प्रज्वल घोम/ यश बहिरम महाराष्ट्र राज्य जुनी पेशन संघटना,जिल्हा अमरांवती यांनी कळविले आहे.