दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
राजगुरूनगर : बदलापूर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या आत्यचाराचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं तोंडाला काळ्या फिती लावून मूक आंदोलन करण्यात आले. राजगुरूनगर मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राजगुरुनगर येथे महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी तोंडाला काळया फिती बांधून मुक आंदोलन केले.
यावेळी आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या राज्य शासनाचा निषेध व्यक्त करण्यासोबतच आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष हिरामण सातकर, सुधीर मुंगसे, काँगेसचे विजय डोळस , सुदाम कराळे, देविदास शिंदे, ज्ञानेश्वर भोसले, अशोक जाधव, प्रशांत गोरे, हरी प्रसाद खळदकर, तन्मय पाचरणे, आकाश बर्गे, विजया शिंदे, राजमाला बुट्टे पाटील, मनिषा सांडभोर, नीता आल्हाट, उर्मिला सांडभोर, संध्या शिंदे, निलिमा राक्षे, शितल थिगळे , उषा बोराडे ,संगीता होरे, ज्योती आमराळे, अलका जोगदंड यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.