श्रीगुरुदेव सेवा मंडळ,खडसंगी तर्फे सामाजिक सभागृह बांधकाम करीता खासदारांना दिले निवेदन..

      रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी..

चिमूर :- खडसंगी येथील श्री.गुरुदेव सेवा मंडळ मागील ४४ वर्षांपासून कार्यरत असून राष्ट्रसंत श्री.तुकडोजी महाराज यांना तत्वज्ञान व प्रणालीनुसार प्रतीदिन सामुदायिक प्रार्थना,लहान बालकांना सुसंस्कार करीता शिबीर उपक्रम,तसेच वार्षीक पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातो.

         यात गावातील तसेच परीसरातील २० ते २५ गावातील नागरीकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो.तद्वतच सुमारे ५ ते ६ हजार नागरीकांचा सहभाग असतो. 

       यात विषेश म्हणजे सर्व-धर्म-समभाव प्रमाणे विविध जाती,धर्माचे व विविध पंथाचे नागरिक उपस्थित राहतात.या करीता श्री गरुदेव सेवा मंडळ,खडसंगीचा भव्य मोठा परीसर असून ०.६० आर जमीन हि नोंदणीकृत आहे. 

        या ठिकाणी वर्षभरात अनेक सामाजीक,सांस्कृतीक कार्यक्रम होत असतात सामने,क्रिकेट सामने,विविध सांस्कृतीक कार्यक्रम व अनेक लग्न सोहळे सुद्धा होत असतात.

         मात्र,या ठिकाणी सर्व सोईसुविधा युक्त सामाजिक सभागृह नाही.त्यामुळे कार्यक्रमाप्रसंगी अनेक अळचणी व समस्या निर्माण होतात. 

      म्हणून खासदार डॉ.नामदेवजी किरसान गडचिरोली चिमूर यांना सर्व सोईसुविधा युक्त २ कोटी रूपयांचा निधी मंजूर करून देण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले. 

       यावेळी इरफान पठाण,नंदकिशोर नागोसे,पवन मेंडुलकर आदी उपस्थित होते.