जळते मणिपूर,कोलकाता,बदलापूर आणि अकोला प्रकरणामुळे देश आणि राज्य निघाले अराजकतेच्या दिशेने….

         “सर्वसामान्य माणूस स्वतःच्या हृदयात जेंव्हा डोकावून पाहतो,आणि विचार करू लागतो की,तथागत बुद्धाचा देश हाच आहे का…?

 स्वामी विवेकानंदाचा हाच देश आहे का….?

      संत कबीर,संत परंपरा असलेला हाच देश आहे का…?

         याच देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीदांनी कुटुंबासहीत रक्त सांडले का.?

        याच देशासाठी राज्यघटना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिली काहो..?

       छत्रपती शिवाजी महाराज,सामाजिक क्रांतीचे अग्रदूत राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले,आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज,विश्वभुषण-विश्वरत्न-युगपर्वत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महाराष्ट्र हाच का हो?

       या प्रश्नांचे उत्तर शोधता शोधता शेवटी लक्षात येते की, अरे..

      अरे हा देश तर मोदी – शहाचा आहे!

        हा महाराष्ट्र तर त्यांनी निर्माण केलेल्या कुसंस्कृतीच्या विळख्यात अडकलेला आहे..

          जे मणिपूर दीड वर्षांपासून (कारणे काहीही असोत) अक्षरंशा जळत आहे, जागतिक मानवी हक्क आयोगाने ज्याची दखल घेतली…..

 जागतिक मीडियाने ज्याची दखल घेतली…..

         कारगिलच्या भारत – पाकिस्तान युद्धात जे जवान शहीद झाले.त्या जवानांच्या अर्धांगिनींची,दीडशेच्यावर जमाव नग्न अवस्थेत त्यांची धिंड काढतो….

          प्रगत तंत्रज्ञान असलेल्या देशात 3 महिन्यानंतर याची वाच्यता होते.अशा मणिपूरला भेट देण्याची तसदी अजूनही आमचे प्रधानमंत्री घेत नाहीत….

       उलट परदेशी वाऱ्या करण्यात अजूनही मग्न आहेत. ऑलिम्पिक खेळाडू फोगाट, भाजपचे नेते ब्रिजभूषण लैंगिक अत्याचार करतात.त्यांना न्याय देण्याची तसदी प्रधानमंत्री न घेता,उलट पक्षाचा जास्त विचार करतात..

        पंजाबच्या शेतकऱ्यांनी दीड वर्षे तीन काळे कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीत आंदोलन करतात.त्याबदल्यात साढे सातशेच्यावर जगाच्या पोशिंद्याना शहीद व्हावे लागते…

          त्याच पंजाबच्या सीमेवरून देशाचे प्रधानमंत्री पंजाबच्या शेतकऱ्यापासून जीवाला धोका आहे म्हणून ताबडतोब दिल्लीला पळून येतात.जसे काही स्वातंत्र्यापूर्वीच्या देशात आम्ही राहतो का काय?असे क्षणभर वाटल्यावाचून राहवत नाही.

         गोध्रा हत्याकांड घडविलेला गुन्हेगार देश चालवितो,सोबतीला जज लोयाचा तडीपार खुनी केंद्रीय गृहखाते चालवितो….

       यांच्या राज्य कारभाराच्या कार्यकाळात वरील घटनांच्या व्यतिरिक्त अपेक्षा तरी आम्ही कोणत्या करणार?

      कारण दहशतीचे हत्यार वापरून देशात आणि राज्यात यांनी आणि यांच्या चेल्याचपाट्यानी हीच री ओढली.

   म्हणून या घटना घडतात…

       परंतू,या सर्वामध्ये कौतुक करावं ते या सर्वसामान्य जनतेचं…. 

     ज्यांनी यांच्या या गलिच्छ राजकारणाला भीक नाही घातली. ट्रेनिंग घेत असलेल्या MBBS विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार आणि खुनाच्या विरोधात कोलकाताची जनता रस्त्यावर उतरली…..

       बदलापूरच्या नराधम अक्षय शिंदेने त्या शाळेतील दोन चिमुकलीवर केलेल्या अत्याचाराविरोधात जनता रस्त्यावर उतरते..,

       अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील जिल्हापरिषद शाळेतील शिक्षक आपल्याच विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे करतो.. 

       या सर्व ताज्या घटना आणि आजपर्यंत झालेल्या अशा सर्व घटना काय सांगून जातात?

        आमच्या देश व राज्याची हीच संस्कृती आहे हेच सांगून जातात का?

        जगात सर्वात मोठी लोकशाही आमचीच म्हणून आम्ही जगात जाऊन टेम्भा मिरवितो.हमारे DNA मे डेमॉक्रेसी है.म्हणूनआमचे प्रधानमंत्री बोंबलत फिरतात. साधा नियम कळत नाही की, अल्पसंख्यांकांच्या सामाजिक न्यायाच्या संरक्षणाच्या पॅरामीटरवरच लोकशाहीचे अस्तित्व मोजले जाते…

         डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातील अनुच्छेद क्रमांक 21आणि 21 अ नुसार प्रत्येक व्यक्तीला जीवित राहण्याचे स्वातंत्र्याचे हक्क आणि मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क प्रत्येक 6 ते 14 वयोगटातील बालकाला प्रदान केलेला आहे.

         आणि त्याच शिक्षण क्षेत्रातील शिक्षक,प्राध्यापक,पी.एच.डी.धारक प्रोफेसर यांची नैतिकता ओसंडून वाहून,ती आचरणातून सिद्ध व्हावी.त्याच्या आदर्शातून बालक घडावे,युवक घडावा,उद्याची तरुण भावी पिढी घडावी जेणेकरून देश एका उज्वल दिशेने वाटचाल करेल,म्हणूनच तर शिक्षक,प्राध्यापक,प्रोफेसर यांना इतरांच्या तुलनेत सर्वात जास्त पगाराची तजवीज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातूनच केलेली असतांना…..

       जर अशा घटना घडत असतील तर या सर्वाना हीच मंडळी जबाबदार आहे…

       थोडक्यात सांगण्याचा सारांश हाच आहे की,प्रत्येकाने नैतिकतेला आचरणातून सिद्ध होणे हाच एकमेव उपाय आहे. दुसरा कोणताही उपाय नाही..

        दुसरे असे की, मी वारंवार सांगत असतो की,100 % देश व राज्य या राज्यकर्त्यांनी संविधानावर चालवीला असता तर निश्चितच ही वेळ आमच्यावर आलीच नसती.निदान आशिया खंडात तरी आदर्श लोकशाहीप्रधान देश म्हणून नावारूपास आला असता.

         इंडियन चित्रपटात नायक सनी देओल म्हणतो, ” चक्कु चलानेवाला एक दिन देश चलाता है…. ” याची आठवण मोदी – शहाकडे पाहुन झाल्याशिवाय राहत नाही…

   या सर्वांवर उपाय म्हणजे संपूर्ण संविधान जागृती आणि सर्व मानवतेची प्रगती

    हाच आहे…..

   संविधान जागृतीचा लेखक

            अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689..