दुर्गापूर वेकोली क्षेत्रात असलेल्या जागेवरील शहिदांचे स्मारक तोडू नका अन्यथा तीव्र आंदोलन :- आदिवासी समाजाचा इशारा…

 प्रेम गावंडे

  उपसंपादक

दखल न्युज भारत

           चंद्रपुरातील वेकोलीच्या दुर्गापूर क्षेत्रात येणाऱ्या जागेवर आदिवासी गोंड गोवारी समाजाच्या वतीने शहिदांचे स्मारक बनविण्यात आले आहे. मात्र वेकोली तर्फे वारंवार स्मारक तोडण्याची धमकी वजा पत्र देण्यात येत असून शहिदांच्या स्मारकाला हात लावला तर तीव्र आंदोलन करू असा इशारा आदिवासी समाजातर्फे देण्यात आला असून काँग्रेस नेते राजू झोडे व गजानन कोहळे यांनी दिला आहे. तसे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे.

          वेकोलीच्या जागेला लागून असलेल्या जागेवर 1994 साली 114 शहिदांचे समर्थनार्थ स्मारक बनविण्यात आले आहे. जिल्हाभरातून अनेक आदिवासी बांधव येथे श्रद्धेने पूजा अर्चा करत असून तेथे सर्व सोयीसुविधा उपलब्ध असून कुठल्याही प्रकारचा कोणालाही त्रास नाही.

           मात्र वेकोलीच्या वतीने वारंवार स्मारक तोडण्याचे पत्र आदिवासी बांधवांना देण्यात येत असून स्मारकाला हात लावण्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन राजू झोडे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे.

          यावेळी केशव सोनवने, संदीप सहारे, मनिष ठाकुर, शंकर नेकाटे, सुरेश राऊत, प्रविण गुरूबेले, विनोद ठाकरे आदि लोकांनी निवेदन दिले.