रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी
चिमूर :- तालुक्यातील सोनेगाव वन येथील रहिवासी पांडुरंगजी सोनवणे यांचे चिरंजीव कु.रोशन पांडुरंगजी सोनवणे वय २२ वर्ष यांचा आज दिनांक २२ ऑगस्ट रोज गुरुवारला सकाळी ८ वाजताच्या दरम्यान तलावात बुडून मृत्यू झाला.
कुमार रोशन हा बैलजोडी धुण्याकरिता तलावावर गेला असता,त्याला तलावातील पाण्याचा अंदाज न लागल्यामुळे त्याचा पाण्यात बुडून नैसर्गिकरित्या मृत्यू झाला.या घटनेमुळे परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत.
या घटनेची माहिती मिळताच,प्रदेश संघटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसीचे धनराज मुंगले यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व स्वतः प्रशासकीय अधिकाऱ्यांना फोन लावून तिथे घटनास्थळी बोलून घेतले आणि घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले.
प्रशासनामार्फत योग्य ती कारवाई करून परिवारास तात्काळ मदत करण्यात यावी अशी विनंती केली व समस्त सोनवणे परिवाराचे सांत्वन केले.
या प्रसंगी उपस्थित शंकर माहुरे,अध्यक्ष तुळशीदास माहुरे बहुउद्देशीय संस्था खडसंगी, प्रदीप भाऊ तळवेकर अध्यक्ष चिमूर ओबीसी काँग्रेस तथा पर्यावरण विभाग,सेवक रामटेके,योगेश दडमल,दिनेश वाळके,वामन भाऊ दडमल,नितेश रणदिवे,राजू भजभुजे,नानक सिंग बावरी,भगतसिंग अधरेला,शिवराज सिंग,अशोक चौके,रमेश दडमल,भूषण कामडी,आदी उपस्थित होते.