डोळ्यात मिरची पावडर फेकून फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्याकडून दिड लाख रुपये लांबविले.. — खल्लार ठाण्याच्या हद्दीतील इटकी फाट्याजवळील घटना..

  युवराज डोंगरे

उपसंपादक/खल्लार

     खाजगी फायनान्स कंपनीच्या  वसुली कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून त्याच्या कडून दिड लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना खल्लार ठाण्याच्या हद्दीतील दर्यापूर अंजनगाव रोडवरील इटकी फाट्याजवळ २१ ऑगस्ट रोजी रात्री १०:१५ते १०:३० वाजताच्या दरम्यान घडली.

       कपिल हिंमत गुडधे (२९) रा. नायगाव बोर्डी ता.अचलपूर हा भारत फायनान्स बँकेच्या दर्यापूर शाखेत वसुली कर्मचारी आहे.

        गावातील महिला बचत गटाच्या वसुलीचे काम त्याच्याकडे आहे.काल दि २१ ऑगस्टला गटाची १,४८,५३२ रुपये वसुली करुन रात्री दर्यापूरकडे येत असतांना इटकी फाट्याजवळ ३० ते ३१ वयोगटातील तिघेजण दुचाकीवर आले व त्यांनी कपिल गुडधेच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून त्याच्याजवळी १,४८,५३२ रुपये रोख व इ कंपनीचे साहित्य असा एकुण १,५५,५३२ रुपयांचा मुद्देमाल लांबविला.

          सदर घटनेची तक्रार खल्लार ठाण्यात फिर्यादी कपिल गुडधे याने दाखल केली असुन त्या तक्रारीवरुन अज्ञात तिघांविरुध्द खल्लार ठाण्यात अप न १७६/२४,३०९(६),३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास ठाणेदार राहुल जंजाळ यांच्या मार्गदर्शनात खल्लार पोलिस करीत आहेत.