भारत बंद,दिल्लीची प्रत्येक सडक जाम… — भाजपा वगळता सर्व पक्ष,”भारत बंद,आंदोलनात सहभागी…

     संघर्ष क्षणिक..

दिल्ली महानगर प्रतिनिधी..

     भारत बंद मुळे दिल्लीची प्रत्येक सडक जाम झाल्याचे चित्र काही तास अनुभवास आले.

       आरक्षण वर्गीकरणाच्या व नाॅन क्रिमिलियरच्या निर्णयाविरोधात देशभरात जनआंदोलनाचे भारदस्त पडसाद उमटले.

       याचबरोबर भारत देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये सुध्दा–भारत बंद–आंदोलनाचे जबरदस्त पडसाद जागोजागी अनुभवायला मिळाले.

         अनुसूचित जाती-जमाती आरक्षणातंर्गत उपवर्गिकरण करणेच,देशाच्या राजकारणात व समाजकारणात परिवर्तन घडवून आणणारे असेल असे आजच्या भारत बंद जनआंदोलना वरुन दिसू लागेल आहे.

         भारत बंद आंदोलनात,”भाजपा वगळता सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटना सहभागी झाले होते.