सुप्रीम कोर्टाचा निर्णय रद्द करण्यासाठी संसदेचे,विशेष अधिवेशन बोलवा :- पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे निवेदन..

युवराज डोंगरे/खल्लार

         उपसंपादक 

        अनुसूचित जाती – जमाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या व क्रीमिलेयरच्या संदर्भात भारताच्या सर्वोच्च न्यायालया द्वारा दिल्या गेलेल्या आरक्षण विरोधी निर्णयाचा माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाने अमरावती जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सादर करण्यात आलेल्या निवेदना द्वारे तीव्र निषेध करण्यात आला आहे.

            सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण विरोधी निर्णयाच्या विरोधात दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी पुकारण्यात आलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने पक्षाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले यांच्या नेतृत्वात 21 ऑगस्ट रोजी दुपारी 11 वाजता अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार श्री ढोले यांच्यामार्फत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाने निवेदन देण्यात आले.

             प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती- जमाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या व क्रिमिलेअरच्या संदर्भात 1 ऑगस्ट 2024 रोजी दिलेला निर्णय हा पूर्णतः असंविधानिक व सामाजिक फूट पाडणारा असा आहे.

         सामाजिक दृष्ट्या घातक ठरणाऱ्या या निर्णया चा पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत असून सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय अत्यंत दुर्दैवी व चिंता व्यक्त करणारा असा आहे.

        त्यामुळे एससी /एसटी वर्गामध्ये सर्वोच्च न्यायालयाप्रती प्रचंड असा रोष व्यक्त केल्या जात आहे.

       तेव्हा अनुसूचित जाती – जमाती समाजा करिता अतिशय घातक ठरणाऱ्या या निर्णयासंदर्भात योग्य तोडगा काढण्यासाठी संसदीय विशेष अधिवेशन बोलावून अनुसूचित जाती- जमाती आरक्षण उपवर्गीकरणाचा व क्रिमीलेअरचा घेण्यात आलेला निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सादर केलेल्या निवेदनातून पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.

        पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले यांच्या नेतृत्वात भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये जिल्हा नेते चंद्रकांत गुल्हाने,शहराध्यक्ष एड.दीपक आकोडे,कार्याध्यक्ष वासुदेव सामटकर,बुद्धदास इंगोले ,जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर वराळकर,प्रदीप ढेंबरे,सुरेश बहादुरे,साहेबराव वानखडे,गंगाधर खडसे,सुनील इंगोले,श्रीकृष्ण शेंडे,चंद्रकांत रंगारी,जानराव वाटाणे,चंद्रभान मोहोड,महिला नेत्या कल्पनाताई नाईक,ज्योतीताई ओगले,वंदनाताई ढाणके,सुनंदाताई नागदिवे,यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.