प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
अनुसूचित जाती-जमाती आरक्षणातंर्गत अ,ब,क,ड,उपवर्गिकरणच्या आणि नाॅन क्रिमिलियरच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णया विरोधात,”आज संपूर्ण भारतात, देशवासियांच्या तर्फे ठिकठिकाणी जोरदार जनआंदोलन सुरु असून,काही ठिकाणी आंदोलकांच्या विरोधात पोलिस बलाचा उपयोग केला जात असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने भारतीय संविधानाच्या विरोधात जाऊन १ आगष्ट २०२४ ला,”अनुसूचित जाती – जमातीच्या विरोधात उपवर्गिकरण व नाॅन क्रिमिलियर अंतर्गत निर्णय दिला.
सदर सर्वोच्च न्यायालयाचा १ आगष्टचा निर्णय संविधानातील अनुच्छेद ५०,१२१,१२५(४),(५),३४०,३१२,चे उल्लंघन करणारा आहे.
नागपुर (महाराष्ट्र)येथील नागरिक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विरोध करताना…
सर्वोच्च न्यायालयाच्या १ आगष्ट २०२४ च्या निर्णयाची,”घटना तज्ञांनी व कायद्याच्या अभ्यासकांनी पळताडणी केली असता,सदर निर्णय संविधान विरोधी असून अनुसूचित जाती-जमातीच्या मुळ जातीभेदाला अनुसरून विकासाला व उन्नतीला,त्यांच्या एकसंघतेला,त्यांच्या समानतेच्या मुलभूत अधिकारांना,छेद लावणारा व बगल देणारा असल्याचे वास्तव पुढे आले.
आणि म्हणून आपल्या न्याय हक्कासाठी २१ आॅगष्ट २०२४ रोज बुधवारला,”भारत बंद,आंदोलन करण्याचा निर्णय देशभरातील बहुजन समाजातील नागरिकांनी घेतलाय,तद्वतच विविध पक्ष प्रमुखांनी व विविध सामाजिक संघटना प्रमुखांनी घेतलाय.
आज सकाळी ९ वाजता नंतर अख्ख्या भारतभरात शांततेच्या मार्गाने,”मोठ्या प्रमाणात,वर्गीकरण व नाॅन क्रिमिलियर च्या विरोधात जनआंदोलन सुरू झाले आहे.देशातील विविध ठिकाणी आंदोलनात सहभागी होण्यासाठी जनतेचा जनमहासागर उसळला आहे आणि देशभरात जन आंदोलन यशस्वी होत आहे.
ब्राह्मण धार्जिण्या इलेक्ट्रॉनिक मिडिया द्वारा अनुसूचित जाती-जमातीच्या नागरिकांचे जनआंदोलन काही भागात अयशस्वी झाल्याचे जाणिवपूर्वक दाखविले जात आहे.त्यांच्या दुष्यपुर्वक प्रचाराला देशांतर्गत बहुजन समाजातील नागरिकांनी बळी पडता कामा नये.
कारण,उच्चवर्णीयांच्या हक्कासाठी त्यांच्या १० लोकांनी आंदोलन केले तरी हेच ब्राह्मण धार्जिणे इलेक्ट्रॉनिक मिडिया वाले,”आंदोलन यशस्वी झाले म्हणून फुगवून फुगवून लांबलचक सांगतात.आणि अनेक दिवस एकाच विषयाला रेटून धरतात,हे वास्तव लपून राहिलेले नाही.
देशातंर्गत महाराष्ट्र,उत्तर प्रदेश,राजस्थान,दिल्ली,बिहार,झारखंड,छतिसगड,मध्यप्रदेश,पंजाब,हरयाणा,आंध्रप्रदेश,तेलंगणा,तामिळनाडू,पश्चिम बंगाल,उत्तराखंड,आणि देशातील इतर राज्यात,”बहुजन समाज पार्टी,भारत मुक्ती मोर्चा,आजाद पार्टी,समाजवादी पार्टी,काॅग्रेस पक्ष आणि आणि इतर संघटनांचे पदाधिकारी रस्त्यावर उतरले असून १ आॅगस्टच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विरोध करीत आहेत व केला आहे.
अनेक राज्यात जनआंदोलनान्वये बसपाने दमखम दाखविला असून त्यांच्या पदाधिकाऱ्यांद्वारे व कार्यकर्त्यांद्वारे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा जोरदार विरोध सुरू आहे.
महाराष्ट्र राज्यांतर्गत वंचित बहुजन आघाडी,बसपा,भारत मुक्ती मोर्चा,रिपाई (सर्व पक्ष) व इतर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते,तसेच अनुसूचित जाती-जमातीच्या सर्व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी झाले आहेत.
देशभरात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर,”पोलिसांनी लाठीचार्ज केला असल्यास,याचे गंभीर परिणाम त्या राज्यातील सरकारला पुढे चालून भोगावे लागणार आहे.
केंद्र सरकारने लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलावून,” संविधानाच्या ९ व्या अनुसूचिमध्ये,अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणाला समाविष्ट केले नाही तर याही सरकारला किंमत मोजावी लागेल एवढे खरे आहे.
मात्र आजचे भारत बंद आंदोलन यशस्वी झाले नाही म्हणणारे महाधुर्तच!
*****
भारत देशांतर्गत जनआंदोलनान्वये विविध ठिकाणचे क्षणचित्रे..
*****
भारत बंद आंदोलनातंर्गत नागपूर (महाराष्ट्र) येथील आंदोलकांचे क्षणचित्रे…