युवती मारहाण प्रकरणी आरमोरी येथे उस्फूर्तपणे बंदचे आयोजन…

अनिलकुमार एन.ठवरे

जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली

      दखल न्यूज भारत

आरमोरी :- कोलकाता येथील एका महिला डॉक्टर बलात्कार व खूनाचा प्रकरण ताजा असतानाच, आरमोरी येथे दि.१५//०८/२०२४ ला शिवम फॅमिली रेस्टॉरंट मध्ये युवती मारहाण प्रकरण घडले.या निमित्ताने सर्व आरमोरीकरानी माणुसकीचे दर्शन घडवत एकत्र येऊन दि.२०/०८/२०२४ उस्फूर्तपणे बंदचे आयोजन करण्यात आले.यातील मुख्य आरोपींना अटक सुध्दा करण्यात आली.

         परंतु या वरील दोन्ही घटनेची पार्श्भूमी जर बघितली तर माणसातील माणुसकी किती खालच्या स्तराला गेली आहे व किती पाशवी वृत्ती वाढलेली आहे याचा प्रत्यय येतो.जेव्हा एखाद्यावर कोणताही अन्याय किंवा अत्याचार होतो ती स्त्री असो की एखादी व्यक्ती तेव्हा तो मानवतेवर झालेला सर्वात मोठा आघात असतो.

        मुळात एवढी पशुता एखाद्या माणसात असू शकते यावर खरोखरच प्रत्येक माणसाला अंतर्मुख करणारी ही घटना आहे.एवढी त्यांना हिंमत कुठून मिळते पैशाच्या व सतेच्या जोरावर आपण काहीही करू शकतो व आपल कोणी काही बिघडवू शकत नाही ही धारणा की प्रशासनाची हतबलता यावर सुध्दा विचार मंथन होणे गरजेचे आहे.

         या घटनेमध्ये आरमोरीकरानी ज्या माणुसकीचे व एकजुटीचे दर्शन घडवले खरोखरच त्याचे कौतुक केले पाहिजे व देशातील प्रत्येक नागरिकानी जागृत राहून अशा घटना घडूच नये याची दक्षता घेण्याची गरज आहे.कारण कोणतीही स्त्री असो, ती कोणत्याही जाती धर्माची असो ती प्रथमतः एक माणूस आहे व तीला माणूस म्हणून जगण्याचा पूर्ण अधिकार आहे.ती या भारत देशाची नागरिक आहे.आणि आपली संस्कृती आपल्याला स्त्रीची इज्जत करायला शिकविते.