रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी..
मैत्री एक आधार फाउंडेशन चिमुर द्वारा गरजवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते.
चिमूर तालुक्यामध्ये ही संस्था काम करत असून गरजवंत विद्यार्थ्यांना ही संस्था शैक्षणिक मदत करत असते.
आजपर्यंत या संस्थेने शेकडो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत केली असून त्यांचे कार्य पुढे पण चालणार आहे.
याच फाउंडेशन द्वारा रक्षाबंधनाच्या औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोटगाव येथील गरजवंत विद्यार्थ्यांना,”ग्रामपंचायत सदस्य कोटगाव तथा पत्रकार उपक्षम रामटेके यांच्या द्वारा शैक्षणिक बॅगचे वाटप करण्यात आले.
शैक्षणिक बॅगचे वाटप झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवले.त्याचबरोबर कोटगाव वासियांनी या फाउंडेशनचे व ग्रामपंचायत सदस्य उपक्षम रामटेके यांचे सुद्धा आभार मानले.