भाविकदास करमनकर
तालुका प्रतिनिधी धानोरा
पत्रकार लोकशाहीतील चौथा स्तंभ असून तालुक्याच्या विकासात पत्रकाराची भूमिका महत्त्वाची आहे तसेच धानोरा येथे सर्वच वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी आहेत.
पण धानोरा येथे पत्रकार भवन नाही.तसेच समस्या मांडण्याकरता तालुक्यातील लोकांना पत्रकार भवनांच्या इमारतीची नितांत गरज आहे.
याचबरोबर आदर्श पत्रकार संस्थेचे रजिस्टर झाले असुन रजिस्टर नंबर महा /09/2017 असा आहे.प्रत्येक तालुक्यामध्ये पत्रकार संघांना महसूल विभागातर्फे पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करून दिल्या जाते.परंतु धानोरा येथे पत्रकार संघाला स्वतःच्या मालकीचे पत्रकार भवन नाही.हीच मोठी शोकांतिका आहे.
तसेच पत्रकार परिषद घेण्यासाठी पत्रकारांना विश्रामगृह येथे पत्रकार परिषद आयोजित करावी लागते. त्यावेळेस ती कधीकधी देण्यास टाळाटाळ करतात आणि म्हणून आपल्या स्तरावरून आदर्श पत्रकार संघ यांना भवन उभारण्या साठी जागा उपलब्ध करून द्यावे,यासाठीचे निवेदन गडचिरोली जिल्हाधिकारी संजय दैने यांना आज दिनांक 19/8/2024 यांना आदर्श पत्रकार संघातर्फे देण्यात आले.
निवेदन देताना आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष दिवाकर भोयर,सचिवसिताराम बडोदे,उपाध्यक्ष शरीफ कुरेशी,समीर कुरेशी,भाविकदास करमनकर,बंडू हरणे,देवराव कुनघाडकर,ओम देशमुख,बाळकृष्ण बोरकर,श्रावण देशपांडे,मारोती भैसारे आदी मान्यवर उपस्थित होते.