दर्यापूर तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष व संघटनांनी 21 ऑगस्टच्या भारतबंद मध्ये सहभागी व्हावे :- ऍड विद्यासागर वानखेडे…

युवराज डोंगरे/खल्लार 

        उपसंपादक

           नुकत्याच भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती, जमाती विरोधात दिलेल्या निर्णया विरोधात त्वरित अध्यादेश आणावा व संदर्भित बाब ही संविधानात अंतर्भूत करण्यात यावी व ओबीसी मध्ये असलेली क्रीमिलेयर सुद्धा रद्ध करण्यात यावे.

              यासाठी दि.21 ऑगस्टला भारत बंद ची हाक देण्यात येत असून सर्व संविधान प्रेमी व भारताच्या लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या समस्त अनुसूचित जाती, जमाती व इटर मागासावर्गीत बांधवांनी हा बंद यशस्वी करण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा.

           दर्यापूर तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष, संघटना यांनी जास्तीत जास्त तसेच ओबीसी बांधवांनीही या बंदमध्ये सामील व्हावे .असे आवाहन बहुजन चळवळीचे कार्यकर्ते ऍड विद्यासागर वानखेडे यांनी दर्यापूर तालुक्यातील नागरिकांना केले आहे.