ग्रीनफ्रेंड्स तर्फे ‘नेचर पार्क’ वर वृक्षांचा अभिनव वाढदिवस… — लाखनी निसर्गमहोत्सवाच्या निमित्ताने होते दरवर्षी आयोजन… — सोबतच नेचर पार्कवर केले वृक्षरक्षाबंधन व वृक्षारोपण…

  चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधि भंडारा 

लाखनी :- ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनी तर्फे लाखनी बसस्थानकावर हिरवागार नेचर पार्क आठ वर्षांपूर्वी अशोका बिल्डकॉन,लाखनी बसस्थानक व लाखनी नगरपंचायतीच्या सहकार्याने तयार करण्यात आला.

          यातील सर्वच झाडे हिरवेगार डेरेदार वृक्ष तयार झाले असून वाटसरु, प्रवाश्याना, तसेच सकाळ सायंकाळी फिरणारे आबालवृद्ध, महिलांना, तरुणांना शीतलतेची गार छाया देत आहेत. अशा या ‘नेचर पार्क’चा आठवा वाढदिवस ‘वृक्षाचा वाढदिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. याचवेळी वृक्षरक्षाबंधन व वृक्षारोपण कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला.

          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लाखनीचे प्रथम नागरिक नगराध्यक्षा त्रिवेणी पोहरकर हे तर प्रमुख अतिथी म्हणून सावरी ग्रामपंचायतचे सरपंच सचिन बागडे, कार्यकारी अभियंता रजत अतकरे व ऋतुजा वंजारी,सेवानिवृत्त नायब तहसीलदार भीमराव कांबळे, ज्येष्ठ नागरिक माणिक निखाडे, प्रकाश वंजारी, पुरुषोत्तमजी मटाले, दुलीचंद बोरकर, मुबंई येथील प्रोजेक्ट मॅनेजर साहिल वंजारी,तसेच ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे पदाधिकारी अशोक वैद्य, अशोक नंदेश्वर, नितीन पटले इत्यादी उपस्थित होते.

            कार्यक्रमाला सहकार्य राष्ट्रीय स्व. संघ भंडारा गोंदिया जिल्हायाची पर्यावरण शाखा,नेफडो जिल्हा शाखा भंडारा , अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडारा व तालुका शाखा लाखनी यांचे सहकार्य लाभले.

            यावेळी प्रास्ताविक करताना ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब कार्यवाह व लाखनी नगरपंचायत पर्यावरण ॲम्बेसेडर प्रा. अशोक गायधने यांनी ‘वृक्षांचा वाढदिवस’ ही अभिनव संकल्पना मागील आठ वर्षांपासून कशी राबविली जात आहे हे सर्व लाखनी निसर्गमहोत्सवाच्या निमित्ताने समजावून दिले.

          सर्व प्रमुख अतिथीचे वृक्षरोपे देऊन स्वागत करण्यात आल्यानंतर गांडूळखताचा गोलाकार केक तयार करून पाने- फुले यांचे सहकार्याने ‘वृक्षांचा आठवा वाढदिवस’ असे त्यावर लिहिण्यात आले. त्यानंतर वृक्षपूजन करून वृक्षराख्या झाडांना बांधण्यात आले.

           यावेळी सर्वांनी वृक्षाचे पूजन करून मनोमन प्रार्थना केली. ‘वृक्ष माझा सखा- मी त्याचा रक्षणकर्ता’ असा व इतर घोषवाक्यांचा उदघोष यावेळी सर्वाकडून करण्यात आला.त्यानंतर नेचर पार्कवरील सर्व वृक्षांना वृक्षराखी बांधण्यात येऊन सर्वच झाडांना मुळाशी गांडूळखत देण्यात आला.

         यानंतर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा भंडाराचे वतीने नेचर पार्कवर संघटनेच्या स्थापना दिन निमित्ताने व ऍड शफी लद्धानी तसेच विनायक कावळे यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रम प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष श्रीधर काकीरवार, जिल्हा मार्गदर्शक हिरामण वाघाये जिल्हा कोषाध्यक्ष विनोद वडतकर, मंगला बोपचे, सतीश वासनिक, सुरेश लांडगे, महेश घरजारे, चेतन मुळे,गजेंद्र खंडाते, अविनाश नगरकर, उमेश शिंगनजुडे यांचे उपस्थितीत घेण्यात आला.

           यावेळी वृक्षराखी बनवा स्पर्धेचे आयोजन ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालयाच्या सहकार्याने घेण्यात आली. स्पर्धेत प्रथम क्रमांक अंकिता अतकरी, अवंतिका निखाडे, सृष्टी वंजारी यांना तर द्वितीय क्रमांक श्रद्धा नंदेश्वर, उन्नती देशमुख, तन्नू ठवकर यांना तर तृतीय क्रमांक वेदांती वंजारी, मयंक वंजारी यांना देण्यात आला. प्रोत्साहनपर क्रमांक प्रांजल मेशराम, केशवी मेशराम यांना प्रदान करण्यात आला.

           वृक्षराखी स्पर्धेचे निरीक्षण राणी लक्ष्मी कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापिका बारई मॅडम, हरित सेना शिक्षिका निधी खेडीकर यांनी केले.

          कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ग्रीनफ्रेंड्सचे अशोक वैद्य, अशोक नंदेश्वर, मुरली नान्हे, नगरपंचायत कोऑर्डिनेटर लीना कळंबे, नगरसेवक संदीप भांडारकर, मारोतराव कावळे, गोपाल बोरकर, अशोक हलमारे लाखनी बसस्थानक प्रमुख श्यामकांत गिऱ्हेपुंजे, नितीन पटले,अंकिता अतकरी, श्रद्धा नंदेश्वर, उन्नती देशमुख, तन्नू ठवकर यांनी या अभिनव उपक्रमासाठी अथक परिश्रम घेतले.