लोकसभेत लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी लढा दिला.. — आता महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढू… — राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार…

      रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी 

             चिमूर महायुती सरकारमध्ये कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांची मालिका सुरूच आहे. भ्रष्टाचारात गुंतलेल्या सरकारने नाशिकमध्ये आणलेले उद्योग गुजरातमध्ये नेले. लोकसभेत लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी लढलो, आता महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणार आहोत. असे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भिसी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

           १० हजार कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, ३ हजार कोटींचा कृषी घोटाळा असे मोठे घोटाळे महायुती सरकारमध्ये झाले. पाच लाख कोटी रुपयांचे कर्ज घेतले आणि निविदा काढल्या, तरीही कंत्राटदारांना काम मिळत नाही. आणि बिल ही बिल मिळू शकले नाही. 10 लाख कोटी रुपयांची जमीन अदानींच्या घशात घातली असताना, मायनारचा उद्योग नाशिकमध्ये आला आणि उद्योग गुजरातमध्ये स्थलांतरित झाला. लोकसभेत आम्ही लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी लढलो, आता महाराष्ट्रात आम्ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत आहोत. असेही पत्रपरिषदेत सागितले

          या पत्रकार परिषदेला खासदार डॉ.नामदेव किरसान, माजी आमदार डॉ.अविनाश वारजूकर,कांग्रेस महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस ओबीसी संगठक धनराज मुंगले, माजी जिप अध्यक्ष डॉ. सतीश वारजूकर, डॉ. विजय गावंडे, माधव बिरजे, प्रा. राम राऊत, विजय मेहर, विवेक कापसे, अविनाश अगडे आदि कांग्रेस पदाधिकारी उपस्थित होते