जि.प.शाळा इटकीच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त लीडर माता तथा सैनिकांचा सत्कार…

युवराज डोंगरे/खल्लार 

        उपसंपादक

            जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा इटकी येथे 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहाच्या वातावरणात पार पडला.

               याप्रसंगी सैनिक संकेत विनायक मोहोड तसेच विकास प्रभुदास चौरपगार यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच गेल्या तीन वर्षापासून काम करणाऱ्या लीडर मातांचे प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले.

             याप्रसंगी ग्रामपंचायत इटकीचे सरपंच विजय मोहोड, उपसरपंच सौ. मंगला राजू वाळसे, ग्रामपंचायत सदस्य भारत चौरपगार , दिनेश शेजे, सौ. लक्ष्मीबाई चौरपगार, ग्रामसेवक भूषण बांते तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिपक रायपुरे, उपाध्यक्ष सौ. मंगला पातुर्डे, सदस्य शरद शेजे, पोलीस पाटील विजय गावंडे, रोजगार सेवक विनायक शेजे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

           इटकी केंद्राचे नवनियुक्त केंद्रप्रमुख अरुण चव्हाण, मुख्याध्यापक सुरेंद्र पतींगे, वि.शि. प्रशांत गहले स‌.शि. स्मिता घोडेस्वार, कॉन्व्हेंटच्या शिक्षिका सौ. शीला मोहन सपकाळ अंगणवाडी कर्मचारी तसेच शापोआ कर्मचारी मंगेश चौरपगार व शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.