युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “हर घर तिरंगा” या कार्यक्रमांतर्गत दिनांक 13 ऑगस्ट 2024 ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत जिल्हा परिषद पूर्व माध्यम मराठी शाळा साखरी येथे मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धांचे आयोजन सुद्धा करण्यात आले. दिनांक 15 ऑगस्ट 2024 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलित करण्यात आली.
त्यानंतर शाळेचे शिक्षक श्री विजय मकेश्वर यांनी ध्वजारोहण केले.या प्रसंगी ग्रामपंचायतचे सरपंच,उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती,गावातील प्रतिष्ठित नागरिक, तरुण उत्साही मंडळ, महिला मंडळ अंगणवाडी ताई व मदतनीस, तसेच महिला बचत गट प्रमुख, तसेच आशा वर्कर प्रमुख,ग्रामपंचायत कार्यालयाचे सचिव, गावचे पोलीस पाटील ,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, सोसायटीचे अध्यक्ष, उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक श्री विनित पारडे यांनी आपल्या प्रास्ताविकांमध्ये मागील तीन दिवसाचा “हर घर तिरंगा” कार्यक्रमानिमित्त शाळेत कोणकोणते उपक्रम घेण्यात आले,याचे थोडक्यात वर्णन केले.
तसेच आज विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्कूल बॅग, नोटबुक व पेन इत्यादी शैक्षणिक साहित्याचे शाळेतील चारही शिक्षकांकडून गोळा केलेल्या निधीतून वितरीत करण्यात आले.
या प्रसंगी गावकऱ्यांनी शाळेत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाचे आणि त्यामध्ये सहभागी विद्यार्थी व शिक्षकांचे मनापासून कौतुक केले. असेच विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शाळेतील सर्व शिक्षक श्री विनीत पारडे ,श्री विजय मकेश्वर,श्री राजेंद्र सांगोले, श्रीमती रेखाताई अभ्यंकर ,तसेच शालेय पोषण आहार स्वयंपाकी सौ मायाताई शिरसाट यांनी परिश्रम घेतले. शेवटी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून राबविण्यात आलेल्या कार्यक्रमाची यशस्वीरित्या सांगता करण्यात आली.