
युवराज डोंगरे
उपसंपादक
खल्लार :- जिल्हा परिषद शाळा रामगांव तर्फे सैनिक मध्ये भरती झालेल्या रामगांव येथील कोरोना काळात शिक्षक मित्र म्हणून सहकार्य करणारे स्वनिल बाबुलाल डोंगरे यांचा तसेच अंगणवाडी मदतनीस म्हणून कोमल खांडेकर यांचा शाळेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी ग्रामपंचायत रामगांव चे सरपंच छायाताई संजय घरडे, उपसरपंच तेजस्विनी घरडे, शाळेचे मुख्याध्यापक डी आर जामनिक, ग्रामपंचायत सदस्य पुरुषोत्तम बोरखडे, बोरखडे ताई,संजय घरडे, संगीता प्रमोद घरडे, रजनी संतोष दोडमिसे, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक गोपाल वसू, गौतम घरडे, पोलीस पाटील ताजने,शाळेतील शिक्षक प्रमिला थोरात,अंजु वानखडे,बाळकृष्ण सोळंके,अंगणवाडी सेविका संगीता वसू, शापोआ कर्मचारी कल्पना पुणेकर, शाळेचे विध्यार्थी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.