दर्यापूर विधानसभा मतदार संघात स्थानिक उमेदवार हवा,बाहेरील उमेदवार नको… — स्थानिक उमेदवाराला अधिक पसंती…

युवराज डोंगरे/खल्लार

          उपसंपादक

            राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. दर्यापूर विधानसभा मतदार संघ हा अनुसूचित जातीकरिता राखीव असल्याने या मतदार संघात उभे राहू इच्छित असलेल्या उमेदवारांचा जोर वाढत आहे. महायुतीकडून अभिजीत अडसूळ हे या मतदार संघावर डोळा ठेऊन आहेत तर भाजपही या मतदार संघाची मागणी करीत आहे. 

          दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना(उबाठा),राष्ट्रवादी(शरद पवार),वंचित बहुजन आघाडी,यापक्षा कडून इच्छूक उमेदवार निवडणूक लढण्यास तयार आहेत. काहींनी तर निवडणूक जाहीर होण्या आधीच महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने तिकीट दिल्यास आपण निवडणूकीच्या रिंगणात राहू असे सूचक वक्तव्य दर्यापूरातील मोजक्याच पत्रकारांना सोबत घेऊन पत्रकार परिषद घेऊन घोषित केले.

           मात्र दर्यापूर विधानसभा मतदार संघात जनतेला बाहेरचा उमेदवार नको आहे. या मतदार संघातील जनतेला स्थानिक उमेदवार पाहिजे त्यामुळे विविध राजकीय पक्षाकडून उमेदवार घोषित करतांना काहीने तर भावी आमदार म्हणून स्वतःला आमदार म्हणून घोषित सुद्धा करून टाकले आहे.

         पण दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदार संघातील लोकांचा जन्मत पाहता त्यांचा कौल मात्र बाहेरचा उमेदवार देऊ नये कारण बाहेरचा उमेदवार हा मतदार संघाचा कुठल्याच प्रकारचा विकास करू शकत नाही असे दिसून येत आहे.

          मागील निवडणूक मध्ये हा मतदार संघ काँग्रेस पक्षाला सुटल्यामुळे या मतदार संघातून बळवंत वानखडे या मतदार संघातून निवडून आले होते आणि आता ते सध्याचे अमरावती जिल्हाचे विद्यमान खासदार म्हणून ते निवडून आले.आता मात्र स्थानिक उमेदवार कोण आणि हा महविकास आघाडी आणि इतर पक्ष कोणत्या स्थानिक उमेदवाराला तिकीट जाहिर करते ते या मतदार संघातील जनतेला स्थानिक उमेदवार देतात की बाहेरचा हे पाहणे अत्यंत गरचेचे आहे.