दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : आळंदी परीसरात सामाजिक व विविध क्षेत्रात उल्लेखनिय योगदान असलेले स्वराज ग्रुप यांच्या माध्यमातून आयोजित रक्तदान शिबीरात 201 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक व राष्ट्रीय कार्यात योगदान दिले असल्याची माहिती स्वराज ग्रुपचे अध्यक्ष आशिष गोगावले दिली.
आळंदी येथील ज्ञानदर्शन धर्मशाळेत स्वराज ग्रुपच्या वतीने आयोजित या रक्तदान शिबीराचे उद्घाटन आळंदी पोलिस स्टेशनचे भिमाजी नरके व आळंदी नगरपरीषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अशोक खांडेभराड, रामदास धनवटे, सुधीर मुंगसे, बबनराव कुऱ्हाडे, रोहिदास तापकीर, उत्तम गोगावले, आनंद मुंगसे, प्रशांत कुऱ्हाडे, रमेश गोगावले, शिरीषकुमार कारेकर, सचिन गिलबिले, दिनेश घुले, सोमनाथ मुंगसे, राहुल चव्हाण, शशीराजे जाधव, मच्छिंद्र शेंडे, यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
स्वराज ग्रुपचे रक्तदान चळवळीमध्ये आळंदी व परीसरात मोलाचे कार्य असून आळंदीत त्यांच्याच प्रेरणेतून रक्तदान चळवळ गतीशील झाली असल्याचे सांगुन हे कार्य सातत्य ठेवून करीत असल्याने त्यांच्या या कार्यातून राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी प्रेरणा घ्यावी असे आवाहन अशोकराव खांडेभराड यांनी केले. या रक्तदान शिबीरात आळंदी व परीसरातील रक्तदात्यांनी उत्सफुर्तपणे रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांचा भेटवस्तु व प्रमाणपत्र देवून मान्यवरांनी सन्मान केला, रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी स्वराज ग्रुपचे पदाधिकारी व सदस्य यांनी परीश्रम घेतले.