रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी
भारतातील अनेक संस्थांनावर मोघल,अकबर,औरंगजेब अशा अनेक राजांनी आक्रमण करुन सत्ता उपभोगली.मात्र,या सर्वामध्ये भारतात व्यापारी म्हणून आलेल्या इंग्रजांनी तब्बल दीडशे वर्षे भारतावर राज्य केले.दीडशे वर्षाच्या कारभारामध्ये इंघांनी भारतीयावर अनेक अन्याय अत्याचार करून भारतीयांना जेरीस आणले होते. इंग्जांच्या या जुलमी राजवटी विरुध्द भारतीयामध्ये स्वातंत्र्याची एक लाट निर्माण झाली होती. यासाठी भगतसिंग,राजगुरु यासारखे क्रांतिकारक ब्रिटीश सरकारविरुध्द पेटून उठले तर दुसरीकडे महात्मा गांधींच्या नेतृत्वात शांतीच्या मार्गाने आंदोलन सुरु होते.
८ ऑगस्ट १९४२ ला ग्वालीया टंकवरून महात्मा गांधींनी दिलेल्या ‘करा अथवा मरा’ या संदेशाने चिमूर येथील क्रांतिकारक इंग्रजांविरूध्द पेटून उठले.
१६ ऑगस्ट १९४२ ला सकाळी ९ याजता गोपाळयाय कोरेकार यांच्या नेतृत्वात अभूतपूर्व प्रभातफेरी काढण्यात आली होती.या प्रभातफेरीत काँग्रेस सेवादलचे श्रीराम बिगेयार, सखाराम माहेवार,बाबुलाल झिरे,दादाजी किरीमकर,मारोती खोबरे,गणपत खेडकर आदी क्रांतिकारक सहभागी झाले होते.
ही प्रभातफेरी जुना बसस्टॅंड जवळून निघाली. या फेरीत ‘व्हाईसराय दिल्ली में जुते खाये गल्ली मे’ या घोषणा देत प्रभातफेरी नागमंदिराकडे निघाली.कारण हा दिवस नागपंचमीचा होता.
दुसरीकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे प्रवचन सुरू होते.या प्रवचनामध्ये चारशे ते पाचशे नागरिक प्रवचन ऐकत होते.
तत्कालीन ठाणेदार हरीराम शर्मा व क्रांतिकारक पांडुरंग पोतदार या दोघांनीही महाराजांपुढे आपली बाजु मांडली होती.त्यावर महाराजांनी दोघांनाही समजवले.दोघेही आपल्या ठिकाणी योग्य आहे. तुम्ही दोघेही आपल काम करा,तुमचा मार्ग तुम्हाला सापडेल,असा सल्ला दिला.
आदल्या दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे देशभक्तीच्या विचारांनी ओतप्रोत भरलेले प्रभावी भजन झाले.या भजनाने क्रांतिकारकांच्या मनात देशप्रेमाची ज्योत पेटली होती.
सर्वाच्या मनांत फक्त क्रांती, क्रांती आणि क्रांती हाच शब्द घुमत होता.भारत मातेचे स्वातंत्र रूप क्रांतीकारकांना दिसत होते.’गुलामी अब नही होना, हमारे प्रिय भारत देश मे… ‘पत्थर सारे चाम्ब बनेंगे भक्त बनेगी सेना’ या भजनाने क्रांतिकारक आणखी इंग्रजांविरुध्द सलाखून निघाले होते.
क्रांतिकारकांपैकी सेवादलाचे उध्दवराव खेमस्कर यांनी क्रांतीचा चिगुल फुकला व सारे कार्यकर्ते अंभ्यकर मैदानात येवून ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देवू लागले.
तेवढ्यात पोलीस दलाने स्वातंत्र्यविराच्या हातातील तिरंगा झंडा हिसकावून घेतला व १२ क्रांतीकारकांना तुरुंगात डांबले. या घटनेने चिडून
क्रांतिकारकांनी आपला मोर्चा इंग्रज अधिकाऱ्यांकडे वळविला.
या क्रांतिकारकांनी इंग्रज अधिकारी हुगाजी,सर्कल इन्सपेक्टर जरासंध,तहसीलदार सोनवाने व कांताप्रसाद यांचा वध केला,याकरिता अनेक
क्रांतिकारकांना लाठीमार खावा लागला.
तर बालाजी रायपुरकर, श्रीराम बिंगेवार व बाबुलाल झिरे,यांना विरमरण पत्कारावे लागले.१६ ऑगस्ट १९४२ च्या या चिमूरकरांनी केलेल्या क्रांतीमुळे पूर्ण देशामध्ये चिमूर शहर १६, १७, आणि १८ ऑगस्ट या तीन दिवस स्वतंत्र झाले होते.
या स्वातंत्र्यांची घोषणा सुभाषचंद्र बोस यांनी बालीन रेडीओवर केली होती.चिमूर शहरात झालेली १६ ऑगस्ट १९४२ ची क्रांती पुर्ण देशामध्ये अजरामर आहे. क्रांतीच्या ज्यालातूनच चिमुरात स्वातंत्र्याची पहाट उगवली होती.
८ ऑगस्ट १९४२ ला ग्वालीया टॅन्क मैदान मुंबई येथे भारत छोड़ो आंदोलनातून महात्मा गांधीनी,”करा अथवा मरा’ चा नारा दिला.गांधीजींच्या या संदेशाने सारा देश इंग्रजांविरुध्द पेटून उठला.महात्मा गांधींच्या या संदेशाने विमूर येथील क्रांतिकारक व नागरिकांनी १२ ऑगस्ट १९४२ पासून गुप्त बैठका घेवून जनजागृती करीत स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले.
या रणशिंगाने प्रेरित होवून चिमुरातील युवक,वृध्द व महिला यांनी ब्रिटीशाविरुध्द बंड पुकारत १६ ऑगस्ट १९४२ ला सर्कल इन्सपेक्टर जरासंघ, पोलीस कांताप्रसाद,नायब तहसीलदार सोनवाने,एसडीओ दुगाजी या इंग्रज अधिकाऱ्यांचा वध करून इंग्रजांचा झेंडा उतरवून तिरंगा ध्वज फडकविला व सलग तीन दिवस स्वातंत्र उपभोगले.
तेव्हा १८ ऑगस्ट १९४२ ला सारा देश इंग्रजांच्या गुलामीत होता. मात्र चिमूर शहर स्वतंत्र झाले होते.