श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…

दिनेश कुऱ्हाडे 

    उपसंपादक

आळंदी : श्री ज्ञानेश्वर संस्थेत देशाचा ७८ वा स्वातंत्र्य दिन आनंदोत्सव मोठ्या दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या संकुलातील ध्वजाचे ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

         यावेळी सचिव अजित वडगांवकर, विश्वस्त दिपक पाटील, श्रीधर कुऱ्हाडे, बाबूलाल घुंडरे, महादेव पाखरे, विद्यालयाचे प्राचार्य दिपक मुंगसे, उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक किसन राठोड, प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, मुख्याध्यापक प्रदीप काळे, मंगला हुंडारे, विवेक चव्हाण, मनीषा केदार, कामिनी मुंडे, बंडू नाना पालवे, रवींद्र जोशी, संतोष इंगळे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कुस्ती व बुद्धिबळ स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालय यांच्या वतीने ‘माॅं के नाम पेड’ उपक्रमाच्या अनुषंगाने विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षाची लागवड करण्यात आली.

          तसेच विद्यार्थी व शिक्षक यांच्या घर व शेतात उपलब्ध जागेत वृक्षारोपण करण्यासाठी वृक्षाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीरंग पवार व राहुल चव्हाण यांनी केले.