रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी..
चिमूर :- तालुक्यातील मजरा (बे.) येथील स्व. समीर वामन राणे (वय/वर्षे – १९) या युवकाचा दि.७ ऑगस्ट रोजी अतिवृष्टीमुळे नाल्याला आलेल्या पुरात बैलजोडीसह वाहून गेल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता.
त्या अनुषगांने आज दिनांक 15 ऑगस्टला आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांसोबत सांत्वनपर संवाद साधत धीर दिला.
तसेच त्यांच्या हस्ते शासनाच्या वतीने नैसर्गिक आपत्ती मधून मृत युवकाच्या कुटुंबीयांना ४ लक्ष रुपये आर्थिक मदत व बैलजोडी नुकसान भरपाई ६४ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.
यावेळी तहसीलदार श्रीधर राजमाने,भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे,भाजपा तालूका महामंत्री हेमराज दांडेकरभाजपा किसान मोर्चा चिमूर विधानसभा संयोजक एकनाथ थुटे,भाजपा युवा नेते समीर राचलवार, सं.गां.नि.अ.यो. समिती अध्यक्ष संजय नवघडे,भाजपा ज्येष्ठ नेते मजहर नाना शेख,भाजपा ज्येष्ठ नेते घनश्याम डुकरे,माजी पं.स.सदस्य अजहर शेख,भाजपा ज्येष्ठ नेते गिरीश भोपे,भाजपा ज्येष्ठ नेते विनोद रणदिवे,भाजयुमो तालूका महामंत्री रोशन बन्सोड,भाजयुमो चिमूर शहराध्यक्ष बंटी वनकर,भाजपा पं. स. सर्कल सहप्रमुख मनी रॉय,भाजपा ज्येष्ठ नेते बंडू बारेकर,भाजपा नेते दशरथ नन्नावरे,भाजयुमो चिमूर शहर महामंत्री अमित जुमडे, भाजपा बूथ अध्यक्ष रविंद्र कोलते, भाजपा बूथ अध्यक्ष प्रमोद श्रीरामे, सरपंच ग्रा. पं. रेंगाबोडी मारोती रहाटे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष वेणूदास बारेकर, भाजपा युवा नेते कुणाल कावरे, भाजपा युवा नेते आशु झिरे, भाजपा युवा नेते उमेश चट्टे, राकेश भोयर, नरेश रणदिवे,अवि मांडवकर,सागर गेडाम आदी भाजपा नेते,पदाधिकारी तथा कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.