गोरवट जि.प.प्राथमिक शाळेत 9 ऑगस्ट क्रांती दिनापासून 15 ऑगस्ट पर्यंत विविध उपक्रमातंर्गत कार्यक्रम संपन्न..

       रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी..

चिमूर :-

           तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा गोरवट येथे दिनांक 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत विविध उपक्रमातंर्गत कार्यक्रम घेतल्या गेले.

     यामध्ये आदिवासी दिन साजरा करण्यात आला व वृक्षारोपण करण्यात आले.याचबरोबर नशा मुक्ती अभियान राबविण्यात आले.तद्वतच गावातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आलाय.

        आज जि.प.शाळेत 78 व्या स्वातंत्र्य दिन साजरा करतांना छोट्या मुलांनी देशभक्तीपर सुंदर भाषणे केलीत.या कार्यक्रमांचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. नन्नावरे सर तर संचालन श्री. आंभोरे सर यांनी केले.

          गावातील विविध समस्या संदर्भात गावकऱ्यांसोबत चर्चा केली.त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले तर दिलदार मनाचे दानशूर श्री.रुपेश भाऊराव श्रीरामे या पालकाकडून गावकऱ्यांना अल्पोहारास्थव,”आलूभात देण्यात आलाय.

        त्यांनंतर सर्व उपक्रमाचे फोटो शासनाच्या har ghar tiranga.Com या वेबसाईट वर upload करण्यात आले.