चारगाव सुंदरी येथे,”अल्कोहोलीक्स ॲनॉनिमस” ची जनजागरण सभा १८ ऑगस्ट रविवारला… — ग्रामपंचायत चारगावं सुंदरी या आदर्श गावाचा अनिभव उपक्रमातंर्गत पुढाकार, “मद्यपाश एक जीवघेणा आजार” या विषयी होणार अगदी विनामुल्य मार्गदर्शन…

ऋग्वेद येवले

   उपसंपादक

दखल न्युज भारत..

 साकोली : [ गुरू. १५ ऑगस्ट ] : महाराष्ट्रात अग्रगण्य आलेली आदर्श गटग्रामपंचायत म्हणून आजही चारगावं सुंदरी ची ओळख कायम आहे. यातच स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून एक व्यसनमुक्ती उपक्रम हाती घेऊन या देशोभिमान दिनी वेगळाच आयाम दिला आहे ते म्हणजे येथील कर्तव्यदक्ष सरपंच मोहन लंजे, तंटामुक्त समिती अध्यक्ष पुरुषोत्तम भिवगडे, उपसरपंचा लता भिवगडे, पोलीस पाटील विरेंद्र सुतार, पोलीस पाटील सुंदरी पुरूषोत्तम भोयर आणि ग्राम विकास अधिकारी के. एम. झोडे यांनी, की स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संपूर्ण दोन्ही गावात जनजागरण सभेचे पत्रके वाटून व्यसनमुक्त होण्यासाठी एक अभिनव उपक्रमात संदेश दिला आहे.

             आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी गावात एक नविन उपक्रमांची पुन्हा सौगात द्यावी या उद्देशाने येथील ग्रामपंचायत – जिल्हा परिषद प्राथ. शाळा परीसरात येत्या रविवारी १८ ऑगस्टला “अल्कोहोलीक्स ॲनॉनिमस” या जागतिक संघटनेच्या आणि अगदी विनामुल्य सेवा देणाऱ्या संघटना “आत्मसमर्पण आंतरसमुह” ( भंडारा गोंदिया गडचिरोली ) अंतर्गत निर्णय समुह सौंदड रेल्वे, युनिटी समुह साकोली, निर्माण समुह बाम्हणी खडकी वतीने “मद्यपाश एक जीवघेणा आजार” विषयावर जनजागरण सभेचे दु. १२ ते ०२ पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने या जनजागरण सभेला जास्तीत जास्त संख्येने येऊन जीवन व्यसनमुक्त कसे जगावे आणि व्यसनमुक्त जीवनाचा खरा आनंद काय हे निश्चितपणे जाणून घेण्यासाठी या जनजागरण सभेचे पत्रक गावात वितरीत करण्यात आले. 

          आज या गावातील जनजागृतीपर पत्रक वितरण कार्यक्रमांत अल्कोहोलीक्स ॲनॉनिमस युनिटी समुह साकोली, निर्णय समुह सौंदड रेल्वे येथील सर्व बांधवांसह गावकऱ्यांनीही या व्यसनमुक्ती उपक्रमाला दूजोरा देत प्रत्येक वार्डातून या रविवारी ता. १८ ला होणा-या जनजागरण सभेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला हे उल्लेखनीय. यात सहकार्य सरपंच, उपसरपंच, तंटामुक्त समिती अध्यक्ष, चारगाव, सुंदरी येथील पोलीस पाटील व ग्रामसेवक यांच्या अतुल्य पुढाकाराने येथे नियमित सभा आयोजित करण्यासाठीही नियोजन आखल्या जात आहे हे नक्की.