रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी..
चिमूर
१६ ऑगस्ट १९४२ ला चिमूरात स्वातंत्र्यासाठी जगप्रसिद्ध क्रांती झाली होती व या क्राती अंतर्गत तात्कालीन चिमूर जिल्हा तीन दिवस स्वतंत्र झाला होताय.
त्या दिनाचे औचित्य साधून चिमुरात १६ ऑगस्टला शाहिद स्मृती दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.त्याच अनुषंगाने कांग्रेसचे खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी १६ ऑगस्टला अभ्यंकर मैदान येथील सभागृहात शाहिद स्मृती दिन कार्यक्रमाच्या परवानगीसाठी मुख्याधिकारी नगर परिषद चिमूर यांना पत्र दिले होते.
मात्र मुख्याधिकारी यांनी चक्क खासदार यांनाच परवानगी नाकारल्याने कांग्रेस शाहिद स्मृती दिन कार्यक्रम घेण्यापासून वंचित झाली आहे.
ग्रामपंचायत कार्यकाळा पासून चिमूर येथे,’शहीद स्मृती दिन,कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक आमदार यांच्या मार्फत घेण्यात येते.हीच परंपरा कायम ठेवत मागील दहा वर्षांपासून आमदार किर्तीकुमार भांगडीया बीपीएड ग्राउंड तर कधी अभ्यंकर मैदान येथे कार्यक्रम आयोजित करतात.
यावर्षी सुद्धा आमदार बंटी भांगडीया यांच्या आयोजनात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सह अनेक भाजपचे नेते उपस्थित राहून शाहिदाना अभिवादन करणार आहेत.
दुसरीकडे काँग्रेस पक्ष पदाधिकाऱ्यांद्वारे शहीद स्मृती दिन कार्यक्रम घेण्यासाठी तालुका कांग्रेस अध्यक्ष विजय गावंडे यांनी १९ जुलैला मुख्याधिकारी यांना परवानगी मागितली.
तर खासदार डॉ.नामदेव किरसान यांनीही १९ जुलैलाच परवानगी मागितली.मात्र मुख्याधिकारी सुप्रिया राठोड यांनी परवानगी देण्याचे तोंडी सांगितले होते.आज पर्यत अभ्यंकर मैदानावर तालुका कांग्रेस पक्षाला व खासदार डॉ.नामदेव किरसान याना परवानगी देण्यात आली नाही.त्यामुळे कांग्रेस शाहिद स्मृती दिन कार्यक्रमा पासून वंचित राहिले असल्याची माहिती पात्रकार परिषदेतून चिमूर तालुका काँग्रेसने आज दिली.
यावेळी काँग्रेसचे चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक डॉ. सतिश वारजूकर,प्रा.राम राऊत,श्री.गजानन बुटके,डॉ विजय गावडे,अविनाश अगडे,ॲड.धनराज वंजारी,पप्पू शेख,राकेश साठोने,पलश वारजूकर,श्रिकांत गेडाम,अक्षय लांजेवार आदी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
***
मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई करा..
शहीद दिन कार्यक्रमासाठी भाजपला दोन ठिकाणी परवानगी दिली.मात्र कांग्रेसचे खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी परवानगीसाठी नगर परिषदेत पत्र देऊनही परवानगी न देता पत्रावर कुठलीच कारवाई केली नाही. त्यामुळे मुख्याधिकारी सुप्रिया राठोड यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी डॉ. सतिष वारजूकर,गजानन बुटके,विवेक कापसे,विजय गावडे यांनी केली आहे.
*****
तत्कालीन मुख्याधीकारी यांनी अर्जावर रिमार्क केला होता. पहिला अर्ज १२ जुलैला भाजपाचा आला होता.त्या अर्जात आमदार भांगडीया यांचा वाढदिवस व १६ ऑगस्ट शहीद स्मृती दिन सोहळा या कार्यक्रमासाठी जागेची मागणी केली होती.
त्यामूळे त्या जागेची परवानगी देण्यात आली.काँग्रेसने १९ जुलैला अर्ज केला होता.मात्र कार्यक्रमाची वेळ भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पार्टीची सारखी होती.त्यामुळे ज्यांचा पहिले अर्ज आला त्याला जागेची परवानगी देण्यात आली.
राहुल कंकाल
प्रभारी मुख्याधिकारी न.प.चिमूर
****
भाजपाने दोन कार्यक्रमाच्या परवानगीसाठी अर्ज १२ जुलैला नगरपरिषदेला दिला होता.त्यामुळे नगरपरिषदने भाजपाला त्या जागेची परमिशन दिली.मात्र त्यांना सभेसाठी जागाच पाहिजे होती तर त्यांच्याकडे सभा घेण्यालायक शहरात अनेक जागा आहेत.त्या जागांची परमिशन का बर घेतली नाही.उगाच समाजात तेड निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
आ.बंटी भांगडीया
चिमूर विधानसभा क्षेत्र…