युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
दर्यापूर तालुक्यातील तोंगलाबाद येथील युवक नामे अनंता रामकृष्ण पवित्रकार(वय २३) हा युवक गावात गायकी म्हणून मित्र सोबत जनावरे चारण्याचे काम करून कुटुंबाला मदत करत होता.आज दिनांक १४ ऑगस्ट रोजी जनावरे घेऊन गेला असता,दुपारी दीड ते दोन वाजताच्या सुमारास सर्व सहकारी सोबत गावला लागून असणाऱ्या चंद्रभागा नदीच्या किनारी असणाऱ्या गायरान जमिनीवर जनावरे चरण्यासाठी केले होता.
त्या दरम्यान काही जनावरें नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर गेल्याने सदर युवक नदीत उतरला व त्याने दुसऱ्या किनाऱ्यावर जायला निघाला असता त्या ठिकाणी डोह असल्याने सदर युवक पाण्यात बुडाला.
आपला सहकारी न आल्याने इतर सहकारी यांनी शोध घेतला असता या युवकाचा मोबाईल व चप्पल आणि काडी किनाऱ्यावर आढळून आल्याने सदर सहकारी यांनी आजूबाजूला शोध घेतला.पण युवक कोठेही आढळून न आल्याने त्यांचे नातेवाईक त्यांनी पोलीस विभाग दर्यापूर व तहसीलदार यांना घेटनेची माहिती दिली.
यावेळी गावातील नागरिकांनी राज्य राखीव दलातील बचाव पथकला पाचारन केले,त्यांनी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास शोध मोहीम सुरू करून अर्ध्या तासात सदर युवकाचा मृतदेह बाहेर काढला.या घटनेने गावात एकच खळबळ उडाली असून नदी गावाला लागून असताना आजपर्यत अशी घटना गावात न घडल्याने आणि सदर युवक हा मनमिळावू स्वभावाचा असल्याने आणि घरची परिस्थिती बेताची असल्याने गावात दुःखाचा डोंगर पसरला आहे.
सदर घटनेचा तपास व पुढील कारवाई दर्यापूर पोलीस करत असून मृतदेह पुढील कारवाई करीता उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे.