रोहन आदेवार
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
साहाय्यक जिल्हा प्रतिनिधी वर्धा
वर्धा: मागील सात वर्षापासून महाराष्ट्र शासनाने घोषणा केल्या आहेत की ओबीसी विद्यार्थ्यांचे वस्तीगृह सुरू करू परंतु आजपर्यंत एकही वस्तीगृह सुरू झालेले नाही.
मागील सत्रात मार्च महिन्यापासून वस्तीगृह सुरू करू असे इतर मागास बहुजन कल्याण विभागाने आश्वासन दिले होते.वस्तीगृह सुरू करताना संबंधाने अर्ज प्रक्रिया सुद्धा झालेली आहे. वस्तीगृह सुरू होण्याच्या तारखा सुद्धा जाहीर करण्यात आल्या होत्या परंतु आजपर्यंत एकही वस्तीगृह सुरू झालेले नाही.
ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाला असताना अर्ज केले होते असे विद्यार्थी आता पदवीच्या दुसऱ्या वर्षाला आहेत.अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र 1 जुलै 2024 पासून सुरू झालेले आहे.या विद्यार्थ्यांना वस्तीगृह न मिळाल्याने खाजगी इमारत भाड्याच्या खोल्यांमध्ये वास्तव्य करावे लागत आहे त्यासाठी त्यांना नाहक आर्थिक ताण सहन करावा लागत आहे.
स्टुडंट्स राइट्स असोसिएशन ऑफ इंडिया (SRAI) संघटनेमार्फत अशी मागणी आहे की आपण 15 ऑगस्ट 2024 पर्यंत वस्तीगृह सुरू करावेत अन्यथा सर्व विद्यार्थ्यांच्या प्रवेश दिनांक पासून तर वस्तीगृह सुरू होई पर्यंतच्या दिनांक पर्यंत विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ द्यावा अश्या प्रकारचे निवेदन समाज कल्याण अधिकारी प्रसाद कुलकर्णी सर यांना देण्यात आले. यावेळी कुलकर्णी यांनी साहित्य आले की वसतिगृह लगेच सुरू करू अशे आश्वासन दिले.
यावेळी रोहन आदेवार,त्रिशूल कळंबे,समीक्षा बहुरूपी,साक्षी जामगडे,अक्षद कांबळे,प्रफुल चिरडे,नेहा शिरभाते,अश्विन मेहतरे,अमिषा घोडे,सार्थक नरंजे सह विद्यार्थी उपस्थित होते.