अश्विन बोदेले
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
दखल न्यूज भारत
कुरखेडा :- कुरखेडा तालुक्यातील कढोली येथील पाच मित्र आंघोळ करायला गावालगत असलेल्या सती नदीच्या घाटावर विशाल ताराचंद सहारे वय 30 वर्ष , अमन लक्ष्मण निंबेकर वय 20 वर्ष , प्रणय ऋषी सोनुले वय 20 वर्षे, देवानंद मारुती चौधरी वय 19 वर्ष , प्रज्योत वामन सहिरे वय 14 वर्षे सर्व कढोली येथील रहिवासी असून हे आंघोळ करण्याकरिता गेले असता, विशाल ताराचंद सहारे याला नदीत असलेल्या खोल पाण्याचा अंदाज न लागल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
ही घटना अंदाजे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. तो पाण्यात बुडाल्याची माहिती त्याच्या मित्रांनी गावात सांगितली. नंतर तिथे गावातील नागरिकांची गर्दी वाढली व कढोली येथील संतोष मानकर ,सुरेश मानकर ,निखिल मानकर, गंगाधर कोल्हे व गावकरी यांच्या सहकार्याने शोध मोहीम राबविली असता घटनास्थळापासून अवघे दहा मीटर अंतरावर शव मिळाले. विशाल ताराचंद सहारे या युवकाच्या मृत्यूमुळे कढोली गावात शोककळा पसरली आहे. त्याच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेले प्रेत शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे हलविण्यात आले असून पुढील तपास आरमोरी पोलीस करीत आहेत.