मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेचे पाणी उमा नदी व गोदनी नदीला सोडावे… — जिल्हाधिकाऱ्याचे आसोलामेंढा प्रकल्प कार्यकारी अभियंता यांना पत्र… — जिल्हाधिकाऱ्यांनी खासदार डॉ.नामदेव किरसान यांच्या निवेदनाची घेतली दखल.

      रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी 

चिमूर:- मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेचे पाणी चिमुर तालुक्यातील उमा नदी व गोदनी नदीला सोडल्यास नदी काठावरील तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनाची सोय होईल.

      तसेच नदीमध्ये जलजिवन मिशन पाण्याची टाकी असल्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होऊन जनावरांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा साठा उपलब्ध होऊन पाण्याची टंचाई भासनार नाही. 

        त्यामुळे मोखाबडीं उपसा सिंचन योजनेचे पाणी उमा नदी व गोदनी नदीला सोडावे असे निर्देश आसोलामेंढा प्रकल्प कार्यकारी अभियंता,यांना जिल्हाधिकारी यांनी पत्राकाव्दारे केली आहे.

      याबाबतची माहिती चिमूर तालूका कॉग्रेसचे अध्यक्ष डॉ. विजय गांवडे यांनी दिली आहे.