तालुकास्तरीय श्रावणी नृत्य स्पर्धा/विविध स्पर्धा… 

   चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधि भंडारा 

         लाखनी :- लोकमत सखी मंच लाखनी येथे दिनांक 16ऑगष्ट 2024ला तालुकास्तरीय श्रावणी नृत्य स्पर्धा व विविध स्पर्धेचे आयोजन स्वागत सेलिब्रेशन हॉल येथे 12 (बारा )वाजे करण्यात आलेले आहे. यात तालुक्यातील सर्व सखी निशुल्क सहभागी होऊ शकतील त्याचप्रमाणे एकल नृत्य हया साठी तीन ते साडेतीन मिनिटे वेळ देण्यात येणार आहे तर सामूहिक नृत्यासाठी पाच मिनिट वेळ देण्यात येणार आहे.

             सामूहिक नृत्यासाठी सदस्य संख्या पाच राहील पाच पेक्षा संख्या जास्त नको. गाणे पाऊस,सण,राधा कृष्ण,गौराई या कुठल्याही विषयावर किंवा देशभक्ती गीतावर आधारित असायला पाहिजे प्रत्येकाने आपले गाणे पेन ड्राइव मधून आणणे गरजेचे आहे.

           विविध स्पर्धा यामध्ये तिरंगी व्यंजन स्पर्धा व राखी मेकिंग स्पर्धा घेण्यात येणार आहे व्यंजन स्पर्धेला सजावटीसाठी पाच मिनिट वेळ देण्यात येणार आहे. तर राखी मेकिंग साठी पंधरा मिनिट वेळ देण्यात येणार आहे. राखी साहित्य आणून त्याच ठिकाणी तयार करायची आहे. त्यात तुम्ही फुल पान धान्य आणि इतर वस्तूंचा समावेश करू शकता विशेषता तिरंगा राखीला विशेष प्राधान्य देण्यात येईल. 

                सर्व सखींनी विभाग प्रतिनिधींनी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहून दिनांक 13 ऑगस्ट पर्यंत नृत्यची व्यंजनाची, राखी मेकिंग ची नावे आपल्या विभाग प्रतिनिधीकडे देणे आवश्यक आहे. वेळेवर कुणाचेही नाव घेण्यात येणार नाही एकदा स्पर्धा सुरू झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी हजर नसाल तर तुमची संधी हुकेल अधिक माहितीसाठी शिवानी काटकर 97 64 39 39 26 वर संपर्क साधावा