पोटनिवणुकीत महाविकास आघाडीच्या राखी परते विजयी..

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

कन्हान : – नगरपरिषद कन्हान-पिपरी प्रभाग क्र. ७ येथे अनुसूचित जमाती सदस्य पदाच्या एका रिक्त जागेसाठी झालेल्या पोट निवडणुकीत ४६.९६ टक्के मतदान झाले होते.मतमोजणी नंतर माहाविकास आघाडीच्या राखी परते विजयी झाल्या आहेत.

      निवडणुक अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा मुळे अनेक मतदारांचे यादीतुन नाव गहाळ झाले असताना सुध्दा महाविकास आघाडीतील कॉग्रेस पक्षाच्या राखी परते यांनी भाजपच्या नंदकिशोर श्रीरामे यांच्या पेक्षा २८ मते जास्त घेतली व विजयी झाल्या. 

      तर नगरपरिषद व राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हिरालाल नारनवरे यांना तिस-या क्रमाकाची मते देऊन सत्ताधाऱ्यांच्या विरूध्द असलेला रोष मतदारानी व्यक्त केला. 

      या निवडणुकीत ३० टक्केच्या वर स्थानिक मतदार,मतदाना पासुन वंचित केल्यावर सुध्दा शिवसेना (उबाठा) गटाचे माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या नेतुत्वात महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा) गटाचे तालुका प्रमुख कैलास खंडार,समीर मेश्राम,कॉग्रेसचे खासदार श्यामकुमार बर्वे,जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक,उपाध्यक्ष नरेश बर्वे,युवक कॉग्रेसचे आकिब सिद्दीकी, नगरसेविका रेखा टोहणे,राकॉ (शरद पवार गट) जिल्हा कार्याध्यक्ष किशोर बेलसरे,अशोक पाटील,बीआरएसपी राज्य उपाध्यक्ष शांताराम जळते,गोंडवाना गणतंत्र पार्टीचे सुखलाल मडावी,प्रहारचे नगरसेवक विनय यादव,आपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर दारोडे सह महाविकास आघाडीच्या पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्त्यांच्या सहकार्याने विजयश्री संपादन करण्यात आल्याने हर्षोल्हास साजरा करण्यात येत आहे.