पोलिस स्टेशन पारशिवनी येथे आगामी सण उत्सव संबंधी सर्वसाधारण सभा सपन्न..

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी :- आज दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी पोलीस स्टेशन पारशिवनी येथे पोलीस पाटील यांची सर्वसाधारण बैठक पोलीस निरीक्षक राजेश कुमार थोरात ठाणेदार पोलीस स्टेशन पारशिवनी यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

      सदर बैठकी मध्ये आगामी सण उत्सव यांचा आढावा घेऊन पोलीस पाटील यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. तसेच पेंच अभयारण्य लगत असणाऱ्या गावांमध्ये वाघांच्या वाढत्या हालचाली बाबत स्थानिक वन विभागाचे कर्मचाऱ्यां मार्फत पोलीस पाटील यांना मार्गदर्शन करण्यात आले.याचबरोबर पोलीस पाटील यांनी वनविभागाला त्यांच्या गावातील अडीअडचणी सांगितल्या.

       त्यावर वनविभाग यांनी योग्य त्या सूचना दिल्या. व आगामी सण उत्सव च्या वेळेस उपस्थित राहुन शांती ठेवण्याचा प्रयत्न करावे बैठकी चे संचालन व प्रास्तविक गोपनिय विभागाचे प्रमुख पोलिस पृथ्वीराज चौहान यांनी केले व सर्व पोलिस पाटीलाना सविस्तर माहिती दिली.