“हर घर तिरंगा” निमित्त “तिरंगा सेल्फी” स्पर्धा… — मनपातर्फे रोख बक्षीसे… — ९ ते १५ ऑगस्ट पर्यंत पाठविता येतील सेल्फी…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

          वृत्त संपादिका 

चंद्रपूर – चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत घरो घरी तिरंगा मोहीम जनजागृतीसाठी येत्या १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ” तिरंगा सेल्फी ” Selfie with Tiranga स्पर्धा राबविली जाणार असुन यात राष्ट्रध्वजाचा पुर्ण सन्मान राखुन आपल्या घरी तिरंगा फडकाविणाऱ्या नागरीकांना रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.

    या सेल्फी स्पर्धेअंतर्गत विजेत्यांस रोख बक्षिसे देण्यात येणार असुन प्रथम रु. ११,०००/- द्वितीय रु. ७०००/- तृतीय रु. ५०००/- तसेच ५०० रुपयांची १० प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार आहेत. नागरीकांना स्वतः च्या घरी लावलेल्या तिरंग्यासोबतचे क्षण सेल्फीद्वारे टिपुन harghartiranga.com या वेबसाईटवर तसेच चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे दिलेल्या गुगलशीट वर पाठवायचे आहेत. तसेच QR कोड स्कॅन करून देखील करता येईल. तसेच सेल्फी नागरिकांना त्यांच्या सोशल मिडियावर सुद्धा अपलोड करावयाची आहे. अपलोड करतांना cmc हर घर तिरंगा  चंद्रपूर हे सर्व हॅशटॅग वापरणे आवश्यक आहे. सेल्फीमध्ये तिरंगा स्पष्ट दिसणे गरजेचे आहे. या स्पर्धेचा कालावधी ०९ ते १५ ऑगस्ट असुन सेल्फी पाठविण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट २०२४ ही आहे.स्पर्धेनंतर ईश्वरचिट्ठीद्वारे निकाल घोषित करण्यात येणार आहे.  

      शासन निर्देशानुसार ०९ ते १५ ऑगस्ट दरम्यान देशव्यापी ‘घरोघरी तिरंगा ’ मोहीम राबवण्यात येणार आहे. देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात देशभक्ती जागृत करणे हा अभियानाचा उद्देश आहे. ७७ वा स्वातंत्र्य दिन घरोघरी तिरंगा फडकवून मोठया उत्साहात अणि आनंदात साजरा केला जाणार आहे.या अभियानात सर्व नागरीकांनी सहभागी होण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी चंद्रपूर महानगरपालिकेच्या CMCchandrapur या फेसबुक पेजला भेट द्यावी.