पूर्वी हृदयातील एकमेकांचे संदेश पोहचवण्यासाठी “कबुतर ” माध्यम होते. त्याच्या गळ्यात चिठी बांधून अथवा खूणगाठ बांधून एकमेकांचे संदेश दुरवर पोहचवता येत असत.एकमेकांचे हृदय वैचारिक तरंगाच्या लहरीनुसार कंपून एकमेकांचे सुख – दुःख, प्रेम,अशा जाणीवेतून समजत असे.
त्यानंतरच्या काळात इंग्रजांनी पोस्टाच्या माध्यमातून ” पत्र व तारा ” च्या माध्यमातून या संदेश वहनाच्या क्षेत्रात क्रांती केली. जा… जा…. पत्रा मार भरारी…. जाऊन बैस माझ्या आईच्या हातावरी….वगैरे ….वगैरे हृदय उलगडू लागलं.हातात पत्र पडल्याबरोबर त्या पत्रातील एक एक ओळ,एक एक शब्द लाख मोलाचा,आणि डोळ्यातून गहिवरून आसवे गाळण्याचा असायचा.कारण यावेळी एकमेकांचे हृदय म्हणजे “दो जान एक दिल”हे अभिव्यक्त व्हायचं.साधे उघडे पोस्ट कार्ड जरी हातात पडले तरी,गगनात आनंद मावत नसे.जर अंतरदेशीय पत्र किंवा लिफाफा जर हातात पडला तर आभाळ ठेंगणे वाटत असे..
कारण हृदयातून हृदयापर्यंत ही कंपणे आपोआप चालत होती.
परंतू,आज मोबाईल क्रांतितून,इंटरनेट,फेसबुक,गुगल,व्हाट्सअप मधून माध्यमात क्रांती झाली व नवनवीन टेक्नॉलॉजी सुद्धा येत आहे.जग एका मुठीत ( हातात मोबाईल घेतल्यावर ) समावलेलं आहे..
परंतू,या मुठीतून…….
“हृदय,केंव्हाच कायमचे उडून गेले आहे!
जे काही थोडेफार शिल्लक आहे. त्यावरच जग तरलेले आहे.
परंतू,कोणत्याही काळात जगातील ज्ञात – अज्ञात,उपेक्षित,वंचित,तत्ववेत्ते आणि महापुरुषांनी याच हृदयातून क्रांती केली. म्हणूनच आज आम्ही भौतिक सुखाचे,चैनीचे दिवस त्याच हृदयाला हद्दपार करून जीवन जगत आहोत.
परंतू,मरण्यापूर्वी दोन तास अगोदर जर जाणीव निश्चितच याच हृदयातील सदसदविवेक बुद्धीला अंतर्मुख होऊन जगलेल्या जीवनाची बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकाराचे गणित करत बसतो तेंव्हा,हृदयाच्या वजाबाकीच्या गणितात बाकी शून्य उरतो.तेंव्हा त्या पश्चातापातच आमचा अंत होतो…
विवेक आणि कुटनीतीची सरमिसळ न करता हृदयातून हृदयात जगण्याचा प्रयत्न करा. तेंव्हाच आपल्याला खऱ्या सुखाचा लाभ शेवटच्या श्वासापर्यंत मिळेल.
जागृतीचा लेखक
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषकऔरंगाबाद, रेणापूरकर,7875452689..