गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी महामंडळातंर्गत लाखो क्विंटल धान छतीसगड राज्यात…  — कोरची-बोटेकासा-छत्तीसगड सरहद्दीवर फसलेल्या ट्रकमध्ये होते,”कढोली शासकीय खरेदी केंद्रातील १ हजार ७४० धान पोते..  — आदिवासी महामंडळाच्या व्यवस्थापकाची चौकशी करण्याची शिवसेनेची मागणी..

             राकेश चव्हाण

गडचिरोली कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

         दर वर्षात सी.आर.एम. मिलिंग साठी राईस मिल धारक आदिवासीं महामंडळ सोबत अटी व शर्तीच्या अधीन राहून करारनामा करतात आणि आणि शासकीय धान केंद्रा वरून भरडाई करिता नेतात.

        परंतु गेल्या काही महिन्या पासून गडचिरोली जील्हातंर्गत शासकीय धान खरेदी केंद्रा वरून धान उचल करून छातीसगड मध्ये ट्रक द्वारे वाहतूक करून नेत असल्याचे प्रकरण पुढे आले आहे.

          तीन-चार महिन्यापूर्वी सुद्धा शासकीय खरेदी केंद्रांतर्गत जिल्ह्यातील सात-आठ धान्य भरलेले ट्रक कोरची समोर पकडण्यात आले होते.

        काल कोरची-बोटेकसा- छत्तीसगड रोड वर फसलेल्या ट्रक मध्ये धान होते.अधिक चौकशी केली असता ते १ हजार ७४० पोते कढोली शासकीय खरेदी केंद्रावरील होते.

           सविस्तर माहिती घेतली असता,दररोज गडचिरोली जिल्ह्यातून छतिसगडला लाखो रुपयांच्या धानाची वाहतूक होत असल्याचे समोर आले.

       या मागे आदिवासी महामंडळाच्या व्यवस्थपक आणि अधिकाऱ्यां हात आहे.मागच्या काळात महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी करोडो रुपयांचा भ्रष्टचार केल्याने कारागृहात आहेत.

        सर्व शासकीय धान खरेदी केंद्रातील उचल केलेल्या धानाची चौकशी करण्यात यावी.तसेच शासकीय धान खरेदी केंद्रातून छातिसगड मध्ये ट्रक द्वारे वाहातुक करण्यात आली आहे, त्या ट्रकांची चौकशी करण्यात यावी,दोषी असलेल्या सर्व संबंधितांवर आणि आदिवसी महामंडळाचे व्यस्थापकांवर पोलिस कार्यवाही करण्यात यावी,या अनुषंगाने १२-८-२०२४ ला जिल्हाधिकारी गडचिरोली यांना निवेदन देण्यात येणार आहे.

          आणि आदिवासी महामंडळाचे व्यवस्थपक यांचा घेराव करण्यात येईल असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल,उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम यांनी दिला आहे.