मनिष शिसोदियांना मिळाली जमानत… — ५०३ दिवस होते कारागृहात..

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

       वृत्त संपादीका 

       दिल्लीचे उपमुख्यमंत्री तथा शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांना आज सर्वोच्च न्यायालयाने जमानत मंजूर केली आहे.

       मागील ५०३ दिवसांपासून म्हणजे १७ महिन्याच्या वर ते कारागृहात होते.कनिष्ठ न्यायालयात व उच्चतम न्यायालयात बऱ्याचदा जमानतसाठी त्यांनी अर्ज दाखल केले होते.परंतू त्यांना जमानत देण्यास दोन्ही न्यायालयानी मनाई केली होती.

           सर्वोच्च न्यायालयाने १० अटींवर त्यांना आज जमानत दिली.त्यापैकी दर सोमवारला पोलिस स्टेशनला भेट देणे,पासपोर्ट जमा करणे,व परदेशात न जाणे या महत्त्वपूर्ण अटी आहेत.

         विना सजा कुणालाही जास्त वेळ कारागृहात ठेवले जात नाही,हा न्यायाचा मजाक आहे, यासह इतर आठ प्रकारे मुद्दे उपस्थित करुन ईडी व सिबिआयला फटकारले.