आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातर्फे सावली शहरातील तीन लोकांना आर्थिक मदत… — विजयकिरण फाउंडेशनचा उपक्रम,सामाजिक बांधिलकीचा दिला परिचय…

     सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधी 

           शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील रहिवासी सौ.भारती मनोहर चौधरी (४३) ह्या शेतात काम करीत असताना रानटी डुकराने हल्ला करीत गंभीर जखमी केले. तसेच कु.अंकुश अजय भंडारे वय ९ वर्षे या मुलाला दुर्दर आजाराने ग्रासले असून सद्या दवाखान्यात उपचार चालू आहेत.

 

       तसेच प्रभाग क्र.०२ मधील श्री.विलास खोब्रागडे वय ५६ वर्षे शारीरिकदृष्ट्या कमजोर,दुर्दर आजाराने ग्रस्त आहेत वरील तिन्ही कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती गरीब व हलाकीची,घरातील कुटुंब प्रमुख मिडेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात सदर रुग्णांना आर्थिक मदत हवी असल्याची माहिती सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक मा.विजय मुत्यालवार व नगराध्यक्ष सौ.लताताई लाकडे यांना मिळाली त्यांनी भेट घेऊन विरोधी पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार यांच्या सूचनेनुसार आर्थिक मदत दिली.

          विरोधि पक्षनेते तथा सावली- ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र तसेच परिसरातील विविध ठिकाणी सामाजिक बांधिलकी जोपासत नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन मदतीचा हात सतत पुढे केला आहे.जनसेवा हिच ईश्वर सेवा माणून सामाजिक बांधिलकी जोपासात आपल्या विजयकिरण फाउंडेशन तर्फे गोर- गरीब,गरजू कॅन्सरग्रस्त लोकांना आर्थिक स्वरूपात मदत करीत असतात.

           आर्थिक मदत देताना नगरसेवक सचिन संगीडवार, प्रफुल वाळके,नितेश रस्से,नगरसेविका सौ.अंजलीताई देवगडे,सौ.साधनाताई वाढई,सौ.ज्योतीताई गेडाम,माजी ग्रामपंचायत सदस्या सौ.कविता मुत्यालवार,शेतकरी सहकारी राईसमीलचे अध्यक्ष मोहन गाडेवार,जनसंपर्क कार्यालय प्रमुख कमलेश गेडाम,कुणाल मालवनकर आदी उपस्थित होते.