डॉ.बाबासाहेबांना अपमानित करून,”भीमसैनिकांचे बळी घेणे, हा काँग्रेसचा अजेंडा होता :- चरणदास इंगोले..

युवराज डोंगरे

   उपसंपादक 

           मराठवाडा विद्यापीठास डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा ठराव महाराष्ट्राच्या दोन्ही सदनामध्ये एकमताने पारित करण्यात आल्यानंतर तब्बल 16 वर्ष नामांतराचा प्रश्न लोंबकळत ठेवून पोलिसा करवी बेशुट गोळीबार करून नामांतर आंदोलनातील भीमसैनिकांचे मुरदे पाडून बळी घेणे हा तत्कालीन काँग्रेस सरकारचा अजेंडा होता आणि तो अमलात आणल्यानंतर नामांतर केल्या गेले खरे परंतु त्यासाठी काँग्रेसच्या नाकर्तेपणा व जातीय मानसिकतेमुळे नाहक अशा निरपराध भीमसैनिकांचे बळी गेले अशा संतप्त भावना पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले यांनी शहीद भीमसैनिकांना श्रद्धांजली वाहताना व्यक्त केल्यात.

        नामांतर लढ्यातील शहीद झालेल्या भीमसैनिकांच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त करण्याकरिता पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने दरवर्षी 4 ऑगस्ट हा दिवस,”शहीद भीमसैनिक दिन, म्हणून पाळला जात असतो.

       यानिमित्ताने पीपल्स रिपब्लिकन पार्टी शहर शाखेच्या वतीने भिमटेकडी परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अमरावती येथे दिनांक 4 ऑगस्ट रविवार रोजी सकाळी 10 वाजता शहीद भीमसैनिक दिन पाळण्यात आला.

       सर्वप्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला चरणदास इंगोले व चंद्रकांत गुल्हाने यांच्या हस्ते हारार्पण करण्यात येऊन शहीद भीमसैनिकांना आदरांजली वाहण्यात आली.

       यावेळी ओबीसी नेते चंद्रकांत गुल्हाने,पीरिपाचे शहर अध्यक्ष एडव्होकेट.दीपक आकोडे,प्रा.डी.के.वासनिक कार्याध्यक्ष वासुदेव सामटकर,डी.जे.खडसे गुरुजी,बुद्धदास इंगोले,सुरेश बहादुरे,प्रदीप ढेंबरे,साहेबराव वानखडे,माणिकराव गाडगे,छापाने साहेब,मंगेश कलाने,बाबूलाल राऊत,भास्कर वराडकर,चंद्रभान मोहोळ,सुनील इंगोले,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.