एससी-एसटी आरक्षणातंर्गत वर्गीकरण करणारा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अमान्य!.. — बि.आर.एस.पी.चे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.सुरेश माने यांच्या नेतृत्वात १० आॅगस्टला निघणार नागपूरात पैदल मार्च..

प्रदीप रामटेके 

 मुख्य संपादक 

          आरक्षण वर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात बि.आर.एस.पी.द्वारा,”पैदल मार्च, आंदोलन येत्या १० आॅगस्टला नागपूरात करण्यात येणार आहे.या पैदल मार्च आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय अध्यक्ष अँड.सुरेश माने करणार आहेत.

          सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर व घटनाद्रोही निर्णय नुकताच दिला आहे.या निर्णयातंर्गत एससी-एसटी आरक्षणाचे वर्गीकरण केले.सदर,”वर्गीकरण आरक्षण,हे जाती तोडणारे आणि फुट पाडणारे असून पुढे चालून ब्राम्हणवादी (मनुवादी) मानसिकतेला पोषक वातावरण निर्माण करणारे आहे.

           आरक्षण वर्गीकरणाचा निर्णय भविष्यात धोकादायक ठरणारा असून सामाजिक समतेला व सार्वभौमत्व संकल्पनेला तळा देणारा आहे.

               आरक्षण वर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात बि.आर.एस.पी.येत्या १० आॅगस्टला नागपूरात,”पैदल मार्च,द्वारा आंदोलन करणार आहे व निर्णयाचा विरोध करणार आहे,निषेध करणार आहे.

       युगप्रवर्तक-युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्रपणे अभिवादन करुन,”पैदल मार्च,”संविधान चौकापासून प्रारंभ होणार आहे व झाशीची राणी चौक येथे समाप्त होणार आहे.

      यानंतर रामगोपाल माहेश्वरी भवन मधुरम सभागृह झाशी राणी चौक सीताबर्डी नागपूर येथे बि.आर.एस.पी.ची सभा पार पडणार आहे.

         आरक्षण वर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात व निर्णयाला अनुसरून बि.आर.एस.पी.चे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.सुरेश माने हे सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.तद्वतच चळवळ निधी दान कार्यक्रम पार पडणार आहे.

             १० आॅगस्टला होणाऱ्या,”पैदल मार्च,आंदोलनात हजारोंच्या संख्येंनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आणि इतर नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन,बि.आर.एस.पी.पक्षाच्या आयोजकांनी केले आहे.