उमरी येथील गावाकऱ्यांना प्यावे लागते गढूळ पाणी.. — डॉ.सतिश वारजुकर यांनी गावकऱ्यांची घेतली भेट…

     रामदास ठूसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि 

            चिमूर तालुक्यातील उमरी येथील प्रादेशिक पाणी पुरवठा नळ योजनेतून परिसरात पाणी पुरवठा केला जातो. मात्र या योजनेचे पाणी मागील ३ दिवसांपासून गढूळ येत असल्यामुळे परिसरातील नागरिकांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे.

                यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या ३-४ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू होती. त्यामुले सर्वत्र पाणिच पाणी झाले होते अशात सामान्य जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे.

                 त्यामुळे स्वतः डॉ. सतिश भाऊ यांनी हातपंपाचे पाणी पिले असता ते पिण्या व वापरण्या योग्य नसल्याने शुद्ध व पिण्यायोग्य पाणी नागरीकांना लवकरात लवकर मिळावे. अशी मागणी गावकऱ्यांनी राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्वयक चिमूर विधानसभा क्षेत्र डॉ. सतिश वारजुकर यांना करताच भाऊंनी तात्काळ गावकऱ्यांसाठी टँकरने पाणी पाठवले आहे.असता गावकऱ्यांनी डॉ. सतिश वारजूकर यांचे आभार मानले. 

              यावेळी तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष विनोद ढाकूनकर, तालुका उपाध्यक्ष तथा खासदार डॉ. नामदेवराव किरसाण साहेबाचे स्वीय सहाय्यक राजू चौधरी,नगर परिषद चिमूर माजी उपाध्यक्ष तुषार शिंदे, माजी नगरसेवक नितीन कटारे,मीडिया प्रमुख पप्पू शेख,मुरलीधर गायकवाड व गावकरी उपस्थित होते.