मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आ.दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पिंपरी बुद्रुक येथे शुभारंभ…

 बाळासाहेब सुतार 

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

           पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दत्तामामा भरणे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

            यावेळी त्यांच्या समवेत तहसीदार श्रीकांत पाटील, तालुका आध्यक्ष हानुमंत कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक जिल्हा उपाध्यक्ष आण्णासाहेब कोकाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंतजी ढोले, संचालक श्रीकांत बोडके, सरपंच भाग्यश्री बोडके, सरपंच परिषद अध्यक्ष ज्योती बोडके, सरपंच सुदर्शन बोडके, उपसरपंच संतोष सुतार, माजी उपसरपंच पांडुरंग बोडके, प्रगतशील बागायतदार विष्णू काटकर, राजेंद्र लावंड ,सोमनाथ बोडके, नाथाआबा रुपनवर, बाळासाहेब घाडगे,आनुराधा गायकवाड, सुनिता शेंडगे, जिल्हा बँक कर्मचारी, तलाटी पाटमास भाऊसाहेब, ग्रामसेवक गणेश लंबाते, तय्यब शेख, शिवाजी पडळकर, साहेबराव नरूटे, ताजुद्दीन शेख, लक्ष्मण गायकवाड, राजू पाटील, महादेव वाळेकर, जीवन पाटील, आशा शिविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी सह महिलावर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

           आमदार दत्तात्रय भरणे यांनी लाडकी बहीण योजनेची माहती महिलांना सांगीतली व शासकिय योजनांचा फायदा जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा आसेही आवाहन केले आहे.

            आपल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफ केलं त्याचप्रमाणे लाडका भाऊ ही योजना आमलात आणली सरकार सर्व स्तरातील जनतेला एकत्रित घेऊन काम करीत आसल्याचीही त्यांनी ग्वाही दिली, आनंद द्या आणि आनंद घ्या हा ही मूलमंत्र ग्रामस्थांना दिला.

           तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने विषयी सविस्तर मार्गदर्शन करून महिलांच्या शंकेच निरासन केले. फॉर्म भरताना महिलांना कोणत्याही अडचणी येऊ देऊ नयेत, तसेच रेशन कार्ड असेल तेही दुरुस्त करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. 

               या कार्यक्रमाचे आयोजन सहकार महर्षी साखर कारखान्याचे संचालक तथा माजी सरपंच श्रीकांत बोडके, पिंपरी बुद्रुक यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. 

                पिंपरी पंचक्रोशीतील सर्वच महिलांनी या कार्यक्रमाला उस्फृत प्रतिसाद दिला व महिलांचे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यात आले.

             कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन महेश सुतार व विलास दोलतडे, यांनी केले.