निरा व भीमा नदी काठावरील नागरिकांनी सावधगिरीने सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे :- आमदार दत्तात्रय भरणे

 बाळासाहेब सुतार 

नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी

            चालू वर्षी पावसाने जोरदार हाजेरी लावल्याने उजनी व वीर धरण परिसरात होत आसलेल्या पावसामुळे नीरा व भिमा नद्यांमध्ये पाणी सोडले जात आसल्याने नदी काठावरील नागरिकांनी सतर्क राहावे व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.

           नीरा नरसिंहपूर येथील नीरा व भिमा नद्यांच्या संगमावर उजनी व वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे संभाव्य उद्भवणाऱ्या परस्थितीची पाहणी व आढावा प्रसंगी आमदार दत्तात्रय भरणे बोलत होते.

           यावेळी तहसीलदार श्रीकांत पाटील, हानुमंत कोकाटे,श्रीमंत ढोले, नरहारी काळे, श्रीकांत दंडवते, सरपंच अर्चना सरवदे, नितीन सरवदे, जगदीश सुतार, दशरथ राऊत, दादासाहेब क्षिरसागर, अरूण क्षिरसागर, समाधान सरवदे, मधुकर सरवदे, अमोल भोसले, पांडुरंग मोरे, मंडलाधिकारी मल्लाप्पा ढाणे, तलाटी शिवाजी बिराजदार, सुरज पाटमास आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.

           माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे पुढे म्हणाले, पुणे परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने वरील धरणे भरून वाहू लागली आहेत.

          त्यामुळे उजनी धरणाच्या पाण्यात वाढ होऊ लागली आहे. तर वीर धरण परिसरात पावसाचा जोर असून धरण भरल्याने नीरा नदीत पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नीरा व भिमा नद्यांच्या काठावरील गावात संभाव्य पुरपरस्थिती ओढवली तर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सुचना देण्यात आले आहेत. प्रशासनाने परस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

             तहसीलदार श्रीकांत पाटील म्हणाले, वीर धरणातून नीरा नदीत ६५ हजार तर उजनी धरणातून भिमा नदीत २१ हजार क्युसेक्सचा विसर्ग सोडला जात असून दौंड येथून एक लाख क्युसेक्सचा विसर्ग उजनीत येवून मिसळत आहे. संभाव्य परस्थिती पाहून पाण्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

              त्यामुळे नीरा व भिमा नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेच्या सुचना देण्यात आले आहेत. नरसिंह – पूर येथील पुरबाधीत कुटुंबाना श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर, भक्तनिवास, नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र व पोलीस स्टेशन इमारतीत स्थलांतरित करण्यासाठी पाहणी करण्यात आली आहे.

            पोलीस, आरोग्य विभाग व आमचा महसूल विभाग कर्मचाऱ्यांना सावधानतेच्या सुचना.